शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानदार होणार बँक प्रतिनिधी

By admin | Updated: April 2, 2017 01:42 IST

पात्र स्वस्त धान्य दुकानदारांना बँकांचे व्यवसाय प्रतिनिधी नेमण्याच्या कामाला गती देण्यात यावी,

नियुक्ती प्रक्रियेला गती द्या : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना गडचिरोली : पात्र स्वस्त धान्य दुकानदारांना बँकांचे व्यवसाय प्रतिनिधी नेमण्याच्या कामाला गती देण्यात यावी, अशा सूचना गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी दिल्या. स्थानिक मंडळ कार्यालयाच्या इमारतीत बँक प्रतिनिधी आणि रेशन दुकानदार यांचे एक दिवशीय शिबिर शनिवारी आयोजित करण्यात आले. या शिबिराला भेट देऊन जिल्हाधिकारी नायक यांनी पाहणी केली. याप्रसंगी ते बोलत होते. या शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विपीन इटनकर, अहेरीचे उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती, जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. चांदूरकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, अहेरीचे तहसीलदार प्रशांत घोरूडे, एटापल्लीचे तहसीलदार संपत खलाटे आदी उपस्थित होते. या शिबिरात भारतीय स्टेट बँकेचे अरूणकुमार, जिल्हा अग्रणी बँकेतर्फे एस. आर. खांडेकर यांनी उपस्थित रेशन दुकानदारांना बँकांचे व्यवसाय प्रतिनिधी बनविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी सांगितल्या. आर्थिक व्यवहार सुलभ होण्यासाठी रेशन दुकानदारांना व्यवसाय प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शिबिराला सिरोंचा, भामरागड, अहेरी तालुक्यातील रेशन दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)