रंगनाथस्वामी, गाेदादेवी महाेत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:33 IST2021-01-18T04:33:13+5:302021-01-18T04:33:13+5:30

सिराेंचा : येथील स्वयंभू बालाजी मंदिरात १३ जानेवारीला रंगनाथस्वामी, गाेदादेवी कल्याण महाेत्सव साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने मंदिरात भाविकांची ...

Ranganathaswamy, Gaedadevi Mahatsav Celebration | रंगनाथस्वामी, गाेदादेवी महाेत्सव साजरा

रंगनाथस्वामी, गाेदादेवी महाेत्सव साजरा

सिराेंचा : येथील स्वयंभू बालाजी मंदिरात १३ जानेवारीला रंगनाथस्वामी, गाेदादेवी कल्याण महाेत्सव साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने मंदिरात भाविकांची गर्दी उसळली. शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या बालाजी मंदिरात धनुर्मासनिमित्त महिनाभरापासून विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. धनुर्मास समाप्तीच्या पर्वावर विवाह साेहळा पार पडला. सकाळी नऊ वाजता मंडप आच्छादन करण्यात आले. १० वाजता विवाह साेहळ्यासाठी लागणारे दागिने आणण्यासाठी मंदिर परिसरातून सपत्नीक अर्चक आरती घेऊन वाजत-गाजत भक्तांसमवेत मुख्य मार्गाने साेने-चांदीच्या दुकानातून पूजन करून दागिने आणले. त्यानंतर दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत विधिवत मंत्राेच्चाराने विवाह साेहळा पार पाडण्यात आला. विवाह साेहळ्याचे पाैराहित्य तेलंगणा (करिमनगर) येथील मुरली क्रिष्णा सिंहाचलम यांनी केले. साेहळ्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

मंदिर परिसर फुले, आंब्यांच्या पानाची ताेरणे, रांगाेळी, आदींनी सुशाेभित करण्यात आला हाेता. त्यामुळे परिसर खुलून दिसत हाेता.

Web Title: Ranganathaswamy, Gaedadevi Mahatsav Celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.