रानडुकराच्या हैदोसाने सूर्यफूल पिकांची नासधूस
By Admin | Updated: April 3, 2016 03:50 IST2016-04-03T03:50:41+5:302016-04-03T03:50:41+5:30
चामोर्शी तालुक्यातील तळोधी (मो.) येथील दागोबा देवस्थानानजीक नदी काठावरील परिसरात अनेक शेतकऱ्यांनी यंदा सूर्यफूल पिकाची लागवड केली आहे.

रानडुकराच्या हैदोसाने सूर्यफूल पिकांची नासधूस
शेतकरी अडचणीत : वन विभागाकडून मदतीचे आश्वासन
तळोधी (मो.) : चामोर्शी तालुक्यातील तळोधी (मो.) येथील दागोबा देवस्थानानजीक नदी काठावरील परिसरात अनेक शेतकऱ्यांनी यंदा सूर्यफूल पिकाची लागवड केली आहे. मात्र रानडुकरे या शेतात हैदोस घालून सूर्यफूल पिकाची प्रचंड नासाडी करीत आहेत. परिणामी शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
तळोधी (मो.) येथील शेतकरी गणपत सातपुते, सुरेश बारसागडे व गव्हारे यांनी नदी काठानजीकच्या आपल्या शेतीत यंदा सूर्यफूल पिकाची लागवड केली. याशिवाय या परिसरात भाजीपाला व मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. मात्र रानडुकर या शेतात हैदोस घालून पिकांची नासाडी करीत आहेत. या संदर्भात शेतकऱ्यांनी वन विभागाच्या कार्यक्षेत्रांतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली आहे. योग्य पाठपुरावा करून कायमची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती शेतकरी गणपत सुरजागडे यांनी लोकमतला दिली आहे. नदी किनारी परिसरातील सर्वच रबी पिकांना रानडुकरांमुळे मोठे नुकसान पोहोचत आहे. त्यामुळे येथील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. वन विभागाने डुकराचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)