रामनामाने दुमदुमला जिल्हा
By Admin | Updated: April 16, 2016 00:58 IST2016-04-16T00:58:16+5:302016-04-16T00:58:16+5:30
मर्यादा पुरूषोत्तम राजा राम यांची जयंती जिल्हाभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.

रामनामाने दुमदुमला जिल्हा
ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम : महाप्रसाद वितरण, मंदिरातही उसळली भाविकांची गर्दी
गडचिरोली : मर्यादा पुरूषोत्तम राजा राम यांची जयंती जिल्हाभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. अनेक ठिकाणच्या राम मंदिरात सकाळपासूनच नागरिकांची गर्दी दिसून आली. सायंकाळच्या सुमारास विविध ठिकाणी महाप्रसाद वितरण कार्यक्रम झाले.
आष्टी - श्रीराम सामाजिक व सांस्कृतिक संस्थेतर्फे आष्टी येथे लोकवर्गणीतून निर्माण केलेल्या श्रीराम मंदिरात प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी प्रभू रामचंद्रांचे प्रतिमेचे दर्शन घेतले. शुक्रवारी सकाळी ६ वाजता पूजा व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी १० वाजतापासून भजन कार्यक्रम झाला. दुपारी १२.३० वाजता रामजन्म सोहळा साजरा करण्यात आला. सजविलेल्या पालखीमध्ये प्रभू रामचंद्राची प्रतिमा ठेवून आरती करण्यात आली. त्यानंतर दुपारी गोपालकाला व महाप्रसाद वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी व्यापारी व भाविकांसाठी आर्थिक मदत मिळाली.
आलापल्ली - आलापल्ली येथील चंद्रपूर मार्गावरील राम मंदिर येथे राम जन्मोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. राम जन्मानिमित्त भजन, कीर्तन, आरती, महाप्रसाद आदी कार्यक्रम झालेत. यावेळी राम जन्माचा सोहळाही साजरा झाला. कार्यक्रमासाठी राम मंदिर कमिटीच्या सदस्यांनी योगदान दिले.
आरमोरी - येथील राम मंदिर देवस्थानात राम जन्मोत्सव शुक्रवारी साजरा करण्यात आला. सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत अमरावती येथील प्रगती मने यांचे प्रवचन सुरू होते. या कार्यक्रमाचा समारोप शुक्रवारी करण्यात आला. तत्पूर्वी दुपारी १२ वाजता आतषबाजीने श्रीराम जन्मसोहळा पार पाडण्यात आला. यावेळी तीन बालकांचे नामकरण करण्यात आले. सायंकाळी महाप्रसाद वितरण व त्यानंतर प्रभू रामचंद्र, माता सीता, लक्ष्मण, हनुमान यांची वेशभूषा धारण करून शहरातून झाकी काढण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भाग्यवान खोब्रागडे, माजी आ. हरिराम वरखडे, बापू पप्पूलवार, शेखर मने, रवींद्र बावनथडे, राम मंदिर समितीचे अध्यक्ष सुभाष खोब्रागडे, ऋषी टिचकुले, अशोक हेमके, गणपती वडपल्लीवार, मोतिराम चापडे, प्रदीप हजारे व बहुसंख्य भाविक उपस्थित होते.
राम मंदिरात राम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाणपोईची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री रवींद्र बावनथडे, भारत बावनथडे, सुनील नंदनवार, प्रदीप हजारे, सुधीर सपाटे, नंदू नाकतोडे, पंकज खरवडे, संतोष करंडे, राजू कंकटवार, सतीश सदाफळे, रोहित धकाते, मुरलीधर नंदनवार, अतुल भोयर, मनोहर निंबेकार, पुंंडलिक दहेकार, महेश घाटे आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
अहेरी - आलापल्ली मार्गावरील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ३७ बटालियनच्या कॅम्पमध्ये राम नवमी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कमांडंट अरूणकुमार मीना यांच्या हस्ते महाप्रसाद व सरबत वितरण करण्यात आले. यावेळी सर्व जवानांनी एकमेकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.
चामोर्शी - शहराच्या मध्यभागी असलेल्या राम मंदिरात रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. रामनवमी निमित्त श्री ब्रम्हचैतन्य महाराजांची उपासणा व नामजपाचा कार्यक्रम नऊ दिवस चालला. शुक्रवारी पूजाअर्चा करून रामकाला करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार, बाळापाटील दीक्षित, वसंत दीक्षित, सुरेश रामानुजमवार, रवी खरवडे, संतोष दीक्षित, दिवाकर कोतपल्लीवार, आनंद बोदलकर, संतोष नैताम, नीरज रामानुजमवार, नरेश अल्सावार, रामेश्वर सेलुकर, अमित यासलवार, पुंडलिक श्रीरामे, अरविंद अवताडे, विठोबा अलसावार, नानाजी अलसावार, मदन चावरे, चरण हजारे, अविनाश कारगिलवार, सुधीर जेट्टीवार, मालती दीक्षित, उषा रामानुजमवार, मोहिनी भीलकर, प्रतिभा कोतपल्लीवार, साधना गण्यारपवार, स्मिता दीक्षित उपस्थित होत्या. सायंकाळी ७ वाजता महाप्रसाद वितरण करण्यात आले.
व्यापारी मंडळ त्रिमूर्ती चौक, गडचिरोली - गडचिरोली शहर व्यापारी असोसिएशनचे सचिव गुरूदेव हरडे यांच्या वतीने शुक्रवारी रामनवमीनिमित्त त्रिमूर्ती चौकात महाप्रसाद व सरबत वितरण करण्यात आले. यावेळी राकाँचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, गडचिरोली शहर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रवी चन्नावार, सुभाष असावा, अजय जक्कुलवार, मोहन दिवटे, रोशन खडसे, पिंटू खडसे, मनोज ठाकूर, तुकाराम पुरनवार, पुरूषोत्तम कसनवार आदींसह बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते. दरवर्षी व्यापारी संघटनेच्या वतीने महाप्रसाद वितरण कार्यक्रम घेण्यात येतो. जिल्ह्यात विविध ठिकाणी श्री रामनवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. हिंदूबांधव रामनवमी मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल- ताशांच्या निनादात मिरवणुका काढण्यात आल्या.