देशद्रोह्यांच्या निषेधार्थ आरमोरीत रॅली

By Admin | Updated: February 26, 2016 01:46 IST2016-02-26T01:46:05+5:302016-02-26T01:46:05+5:30

जेएनयूमध्ये लोकशाहीच्या मंदिरावर हल्ला करणाऱ्या व जवानांना मारणाऱ्या अफजलचा त्यांनी जयजयकार केला.

Rally in protest against anti-trafficking | देशद्रोह्यांच्या निषेधार्थ आरमोरीत रॅली

देशद्रोह्यांच्या निषेधार्थ आरमोरीत रॅली


आरमोरी : जेएनयूमध्ये लोकशाहीच्या मंदिरावर हल्ला करणाऱ्या व जवानांना मारणाऱ्या अफजलचा त्यांनी जयजयकार केला. तसेच शहीदांचा अपमान करणाऱ्या अशा देशद्रोही लोकांच्या निषेधार्थ आरमोरी शहरात गुरूवारी सकाळच्या सुमारास रॅली काढून निषेध करण्यात आला.
सदर रॅली येथील राम मंदिर चौकातून काढण्यात आली. मुख्य मार्गावर रॅली फिरल्यानंतर भगतसिंह नगरात या रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी निषेधसभा घेण्यात आली. या सभेला भाजपाचे युवा नेते पंकज खरवडे, माजी जि.प. सदस्य वेणू ढवगाये, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र शेंडे, सत्यनारायण चकीनारपवार यांनी मार्गदर्शन केले. सभेनंतर देशद्रोही लोकांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष नंदू पेटेवार, शहर अध्यक्ष प्रदीप हजारे, नंदू नाकतोडे, प्रणव गजपुरे, भूषण सातव, अंकुश खरवडे, युगल सामृतवार, अभिजीत बेहरे, चंदू भाकरे, अविनाश दिवटे, राहूल तितीरमारे, सुशील पोरेड्डीवार, विनोद बेहरे, नारायण धकाते, मुलचंद कच्छला, कुणाल भरणे, प्रसाद साळवे, बंडू गायकवाड, संजय सोनटक्के, रोहित धकाते, स्वप्नील धात्रक, संजू खरकाटे, सचिन बेहरे आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Rally in protest against anti-trafficking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.