रॅली व पदयात्रेने निवडणूक प्रचाराची सांगता

By Admin | Updated: October 13, 2014 23:20 IST2014-10-13T23:20:51+5:302014-10-13T23:20:51+5:30

अहेरी विधानसभा मतदार संघात आज काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह अपक्षांनी शक्तीप्रदर्शन करीत पदयात्रा काढल्या. काँग्रेसचे उमेदवार मुक्तेश्वर गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार

Rally and pedestrian election campaign | रॅली व पदयात्रेने निवडणूक प्रचाराची सांगता

रॅली व पदयात्रेने निवडणूक प्रचाराची सांगता

अहेरी : अहेरी विधानसभा मतदार संघात आज काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह अपक्षांनी शक्तीप्रदर्शन करीत पदयात्रा काढल्या. काँग्रेसचे उमेदवार मुक्तेश्वर गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम, भाजपचे उमेदवार अम्ब्रीशराव महाराज, अपक्ष उमेदवार दीपक आत्राम, बसपाचे उमेदवार रघुनाथ तलांडी यांनी रॅली व पदयात्रा काढली. अहेरी येथे मोटार सायकल रॅली व पदयात्रा ढोल-ताशाच्या गजरात काढण्यात आली. त्यामुळे अहेरीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता.
अहेरी येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेत उमेदवार मुक्तेश्वर गावडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेबुब अली, शीला चौधरी, व्यकटेश चिलनकर, उषा आत्राम, सलीम भाई, बब्बू शेख, अरूणा गेडाम, सुरेश मडावी, रामप्रसाद मुंजमकार, जगदीश जुमडे, अशोक आलाम, मधुकर तुंगावार, प्रमिला मडावी, अर्जुन कांबळे, मोईन खान, सुनिल चांदेकर, श्याम दहागावकर, संजय मेडपल्लीवार, मांतेश चटारे, रतन मडावी, श्रावण झाडे, परवेज शेख, फरजाना शेख, ममता आत्राम, मिना पानेम, मुन्नी शेख, परदेशी, आलाम, साई पुलगम, नसिम बानो, राबिया शेख आदी काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.
उमेदवार मुक्तेश्वर गावडे यांच्या निवासस्थानातून प्रचार रॅली काढण्यात आली. त्यानंतर पदयात्रा गांधी चौक, राजमहल परिसर, वीर बाबुराव शेडमाके चौक, तहसील कार्यालय परिसर, धरमपूर, मौलाना आझाद चौक, बौद्ध विहार, गानली मोहल्ल्यासह अहेरीतील अनेक वार्डात काढण्यात आली. रॅलीचा समारोप महेबुब अली यांच्या निवासस्थानी करण्यात आला. पदयात्रेत शेकडो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अहेरी विधानसभा क्षेत्रात सर्वच राजकीय पक्षांनी ढोल-ताशाच्या गजरात रॅली काढली.

Web Title: Rally and pedestrian election campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.