राकाँच्या महिलांकडून केंद्र शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:35 IST2021-05-16T04:35:52+5:302021-05-16T04:35:52+5:30

देशभरात कोरोनाचे अस्मानी संकट असतानाच केंद्र सरकारच्या वतीने महागाईचे सुलतानी संकट जनतेवर लादण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सत्तेत ...

Rak's women protest against the central government | राकाँच्या महिलांकडून केंद्र शासनाचा निषेध

राकाँच्या महिलांकडून केंद्र शासनाचा निषेध

देशभरात कोरोनाचे अस्मानी संकट असतानाच केंद्र सरकारच्या वतीने महागाईचे सुलतानी संकट जनतेवर लादण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सत्तेत येताना जनतेला ‘महागाईपासून मुक्ती व अच्छे दिनचे’ स्वप्न दाखविले. देशातील जनतेने त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून त्यांच्या हातात देश सोपविला. मात्र पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आदींसह सगळ्याच वस्तूंचे दर वाढवून केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढविल्याने सर्वसामान्य जनतेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. केंद्र सरकार अकार्यक्षम आहे, असा आराेप करीत महिला पदाधिकाऱ्यांनी निषेध नाेंदविला. वाढत्या महागाईविराेधात केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी महिला राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर महिला सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. याप्रसंगी महिलांनी प्रतीकात्मक चूल पेटविली. गडचिराेली येथे रा. काँ. सामाजिक न्याय विभागाच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रमिला रामटेके यांच्या नेतृत्वात गीता फाफनवाडे, कीर्ती भांडेकर, कमला भांडेकर, छाया उमरगुंडावार, गीता भुरसे, निम्मी भांडेकर आदींनी निषेध नाेंदविला.

===Photopath===

150521\15gad_3_15052021_30.jpg

===Caption===

केंद्र शासनाचा निषेध नाेंदविताना महिला पदाधिकारी.

Web Title: Rak's women protest against the central government