राकाँचा ओबीसी रथ जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:00 IST2018-02-18T23:59:43+5:302018-02-19T00:00:00+5:30

ओबीसींवर शासन करीत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याबरोबरच ओबीसींना त्यांच्या हक्काविषयी जागृत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी रथ तयार केला असून या रथाचे देसाईगंज येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

Rakha OBC Rath district | राकाँचा ओबीसी रथ जिल्ह्यात

राकाँचा ओबीसी रथ जिल्ह्यात

ठळक मुद्देओबीसींवरील अन्यायाला फोडणार वाचा

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : ओबीसींवर शासन करीत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याबरोबरच ओबीसींना त्यांच्या हक्काविषयी जागृत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी रथ तयार केला असून या रथाचे देसाईगंज येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
यावेळी ओबीसी सेलचे प्रांताध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक झरकर, देसाईगंज शहराध्यक्ष लतीफ शेख, तालुकाध्यक्ष विलास भागडकर, ओबीसी सेलचे शहर अध्यक्ष गिरीश देशमुख, दादाजी भर्रे, श्याम धाईत, यशवंत डिसूजा, दीपक नागदेवे, साखरे, युनिस शेख व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. देसाईगंज येथे जनजागृती केल्यानंतर सदर रथ सायंकाळी गडचिरोली येथे पोहोचला. सोमवारी पोर्ला व गडचिरोली येथे जनजागृती केली जाणार आहे. त्यानंतर सदर रथ मूल मार्गे चंद्रपूर जिल्ह्यात जाणार आहे. विद्यमान शासनाकडून ओबीसींवर मोठ्या प्रमाणात अन्याय केला जात आहे. या अन्यायाविरोधात जनशक्ती उभी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसने रथ तयार करून या रथाच्या माध्यमातून राज्यभरात जनजागृती केली जात आहे.

Web Title: Rakha OBC Rath district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.