प्रगतीसाठी शिक्षणाची चळवळ उभी करा

By Admin | Updated: October 11, 2016 03:11 IST2016-10-11T03:11:06+5:302016-10-11T03:11:06+5:30

शिक्षणामध्येच समाज परिवर्तनाची व विकासाची क्षमता आहे. ही बाब बौद्ध भिक्कूंनी ओळखली होती.

Raise education movement for progress | प्रगतीसाठी शिक्षणाची चळवळ उभी करा

प्रगतीसाठी शिक्षणाची चळवळ उभी करा

कुरखेडा : शिक्षणामध्येच समाज परिवर्तनाची व विकासाची क्षमता आहे. ही बाब बौद्ध भिक्कूंनी ओळखली होती. त्यामुळे अनेक बौद्ध भिक्कू शिक्षणाची चळवळ चालवित होते. हे काम इतरही संस्थांनी पुढे नेले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. अश्विनकुमार मेश्राम यांनी केले.
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ व सोशियल एज्युकेश मुव्हमेंटच्या वतीने समाज शिक्षण चळवळीअंतर्गत कुरखेडा येथील राजीव भवनात रविवारी समाज प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मागदर्शन करताना ते बोलत होते.
शिबिराचे उद्घाटन महासंघाचे राज्यध्यक्ष अरूण गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य अशोक इंदुरकर, नगरसेवक आशा तुलावी, अर्चना वालदे, चित्रा गजभिये, अ‍ॅड. उमेश वालदे, सहायक संचालक धर्माजी पेंदाम, गटशिक्षणाधिकारी रवींद्र शिवणकर, प्रेम गजभिये, प्रवीण दोडके, रवी पोथारे, चंदुराव राऊत, डॉ. मोरेश्वर बोरकर, अण्णाजी बोरकर, श्याम रामटेके, धर्मानंद मेश्राम, कास्ट्राईब कर्मचारी कल्याणचे जिल्हाध्यक्ष विजय बन्सोड, गौतम मेश्राम, सदानंद ताराम, तुमेन बन्सोड, जे. पी. हलामी, नरेश जेंगठे, अनिता मेश्राम, इंदू तितरे, आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरादरम्यान माळी समाज संघटनेचे रमेश गुरनुले, संगीता नंदीगवडी व विजय बन्सोड, त्यांच्या पत्नी उषाकिरण विजय बन्सोड यांचा सत्कार करण्यात आला. संचालन कपुरदास उंदीरवाडे यांनी केले. यशस्वीतेसाठी गौतम लांडगे, विनोद मडकाम यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Raise education movement for progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.