सम्राट अशोक बुद्ध विहारात वर्षावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:33 IST2021-07-26T04:33:16+5:302021-07-26T04:33:16+5:30
समारंभाची सुरुवात त्रिशरण, पंचशील, बुद्धवंदना व धम्मचक्रप्रवर्तन सुत्ताने धम्मसेविका वंदना धोंगडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. याप्रसंगी अभियंता नरेश मेश्राम, ...

सम्राट अशोक बुद्ध विहारात वर्षावास
समारंभाची सुरुवात त्रिशरण, पंचशील, बुद्धवंदना व धम्मचक्रप्रवर्तन सुत्ताने धम्मसेविका वंदना धोंगडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. याप्रसंगी अभियंता नरेश मेश्राम, चंदुराव राऊत, विजय बन्सोड, मारोती रामटेके, सुरेश मेश्राम, इंदू तितरे, निर्मला रामटेके, आशा दहिवले, उषाकिरण बन्सोड, अनिता मेश्राम, देवांगणा रामटेके, रागिणी बोरकर, मंदा बन्सोड, वैशाली गायकवाड, गिरीधर मेश्राम, प्रा. प्रभाकर मेश्राम, गौतम लांडगे, राजविलास गायकवाड, ललीत खोब्रागडे, देवीदास बन्सोड, वासंतिका शहारे, मित्रविंदा रामटेके उपस्थित होते. वर्षावास कालावधीत भिक्खू संघाने विहारात निवास करून सायंकाळी नागरिकांना धम्मप्रवचन करावे व उपासकांनी उपस्थित राहून ग्रहण करावे. तसेच धम्माचे आचरण करावे. या मुख्य हेतूने तथागत बुद्धांनी वर्षावास नियमांची सुरुवात केली. तेव्हापासून वर्षावास पाळण्यात येत आहे. बुद्ध धम्मातील हा महत्त्वाचा कालावधी असून या कालावधीत प्रत्येकांनी बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करावा, असे आवाहन धम्मसेविका वंदना धोंगडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन विजय बन्सोड तर आभार गिरीधर मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य उपासक, उपासिका उपस्थित होते.