शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

पावसाने गाठली सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST

यावर्षी सुरूवातीला अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळेच रोवणीची कामे रखडली होती. शेतकरी चिंतेत पडला असतानाच १० दिवसांपूर्वी राज्यभरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कमी पडलेल्या पावसाची कसर भरून निघाली आहे. २३ ऑगस्टपर्यंत जिल्हाभरात ९५५.२ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ९५४.५ मिमी पाऊस झाला आहे. अजुनही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील तलाव भरले तुडूंब : आठ तालुक्यांमध्ये मात्र अजुनही कमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील १० दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने अपेक्षित सरासरीची कसर भरून काढली असून २३ आॅगस्टपर्यंत जिल्हयात अपेक्षित पावसाच्या ९९.९ टक्के पाऊस झाला आहे.यावर्षी सुरूवातीला अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळेच रोवणीची कामे रखडली होती. शेतकरी चिंतेत पडला असतानाच १० दिवसांपूर्वी राज्यभरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कमी पडलेल्या पावसाची कसर भरून निघाली आहे. २३ ऑगस्टपर्यंत जिल्हाभरात ९५५.२ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ९५४.५ मिमी पाऊस झाला आहे. अजुनही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पुन्हा काही दिवस पाऊस पडेल, अशी अपेक्षा आहे. असे झाल्यास अपेक्षित सरासरीच्या अधिकचे पाऊस पडू शकते.जिल्ह्यात आता रोवणीची कामे आटोपली असून निंदनाची कामे सुरू आहेत. जिल्ह्यात जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडते. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होते. धानपिकाला शेवटपर्यंत पाण्याची गरज भासते. अशा वेळी तलाव, बोड्यांमधील पाणी धान पिकाला दिले जाते. मागील आठ दिवसात झालेल्या पावसामुळे तललाव, बोड्या पूर्णपणे भरल्या आहेत. पाऊस सुरूच असल्याने पुन्हा १५ दिवस तलाव, बोड्यांच्या पाण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यानंतर मात्र तलावबोड्या भरल्या असल्याने शेतकरी निश्चिंत आहेत.देसाईगंज तालुक्यात सर्वात कमी पाऊसयावर्षी देसाईगंज तालुक्यात सर्वात कमी म्हणजे, केवळ ६९१.३ मिमी पाऊस पडला आहे. या तालुक्यात २३ ऑगस्टपर्यंत ९८६.६ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ६९१.३ मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित सररासरीच्या ७०.१ टक्के एवढा पाऊस झाला आहे. धानोरा तालुक्यात केवळ ७३९ मिमी पाऊस पडला आहे. अपेक्षित पावसाच्या ६९.२ टक्के एवढा आहे. गडचिरोली तालुक्यात ११०१.३ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ७५५.४ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. अपेक्षित सरासरीच्या केवळ ६८.६ टक्के एवढाच पाऊस झाला आहे. कुरखेडा तालुक्यात अपेक्षित सरासरीच्या ८७.५, आरमोरी ७९.७,चामोर्शी ९५.४, एटापल्ली ९४.२, कोरची ६९.२, देसाईगंज ७०.१ मिमी पाऊस झाला आहे. भामरागड तालुक्यात सर्वाधिक १३६२.६ मिमी पाऊस झाला आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प