पावसाची रिपरिप;रस्ते चिखलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:59 IST2018-07-09T22:59:30+5:302018-07-09T22:59:52+5:30
जिल्हा परिषदेंतर्गत यंदा रस्त्यांची दुरूस्ती व निर्मितीकरिता मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करण्यात आला. दुर्गम व सुगम अशा दोन गटात निधीची विभागणी करण्यात आली. अधिकाधिक निधी दुर्गम भागाला उपलब्ध झाला. परंतु या भागात अधिकारी काम करण्यास धजावत नसल्याने कंत्राटदार आपल्या मनमर्जीप्रमाणे बांधकाम करतात.

पावसाची रिपरिप;रस्ते चिखलमय
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : जिल्हा परिषदेंतर्गत यंदा रस्त्यांची दुरूस्ती व निर्मितीकरिता मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करण्यात आला. दुर्गम व सुगम अशा दोन गटात निधीची विभागणी करण्यात आली. अधिकाधिक निधी दुर्गम भागाला उपलब्ध झाला. परंतु या भागात अधिकारी काम करण्यास धजावत नसल्याने कंत्राटदार आपल्या मनमर्जीप्रमाणे बांधकाम करतात. असाच काहीसा प्रकार एटापल्ली तालुक्यात रस्त्यांच्या दुर्दशेवरून दिसून येत आहे. अल्पावधीतच रस्त्यांची दुरवस्था होऊन सध्या चिखल पसरला आहे.
जिल्हा परिषदेने मागील वर्षी जवळपास १०० कोटी रूपयांचे ३०-५४ या लेखा शीर्षांतर्गत कामाचे नियोजन केले होते. यातील अनेक कामे जिल्ह्याच्या दुर्गम भागात आहेत. एटापल्ली तालुक्यात या निधीतून अनेक विकास कामे करण्यात आली. एटापल्ली-जारावंडी या मुख्य मार्गापासून आतमध्ये काही कामे करण्यात आली. पण कंत्राटदारांच्या मनमानीमुळे सदर कामे निकृष्ट दर्जाची झाली असून अल्पावधीतच रस्ते उखडून चिखलमय झाले आहेत. परंतु या प्रकाराकडे तालुकास्तरीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी कंत्राटदारांचे फावले आहे.
जिमलगट्टा येथे पसरली घाण
जिमलगट्टा येथील मुख्य मार्गावर सर्वत्र घाण पसरली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोकाट जनावरांमुळे संपूर्ण मार्गावर घाण पसरली असल्यामुळे आवागमन करणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. शाळेत ये-जा करणाºया व रस्त्यांवर फिरणाºया लोकांना रस्त्यावरील घाणीचा प्रचंड त्रास होत आहे. या चिखलामुळे डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना विविध संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता नाकरता येत नाही. शासनाने चालविलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा निधी येत असून त्याचा योग्य वापर न होऊन स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा उडत आहे. पशुपालकांनी आपल्या गुरांना गोठ्यात बांधून स्वच्छ भारत अभियानास हातभार लावावा, पुन्हा मुख्य मार्गावर चिखल व घाणीचे साम्राज्य निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.