रांगीत सात दुकानांमध्ये चोरी

By Admin | Updated: October 21, 2016 01:22 IST2016-10-21T01:22:41+5:302016-10-21T01:22:41+5:30

रांगी येथील मुख्य चौकातील दुकान लाईन फोडून अज्ञात चोरट्यांनी १९ आॅक्टोबरच्या मध्यरात्री सात दुकानांवर डल्ला मारला

Raid in seven shops | रांगीत सात दुकानांमध्ये चोरी

रांगीत सात दुकानांमध्ये चोरी

पोलिसांत तक्रार : पानठेले, किराणा दुकान व हॉटेल फोडले
रांगी : रांगी येथील मुख्य चौकातील दुकान लाईन फोडून अज्ञात चोरट्यांनी १९ आॅक्टोबरच्या मध्यरात्री सात दुकानांवर डल्ला मारला व ३ हजार ४५० रूपयांचा माल लंपास केला.
तोशिफ पठाण यांच्या दुकानातून ७०० रूपये, मुरलीधर मेश्राम यांच्या दुकानातून ५०० रूपये शबीर पठाण यांच्या दुकानातून ३५० रूपये, अजमीर पठाण यांच्या दुकानातून ४०० रूपये, गुरूदेव नैताम यांच्या दुकानातून २०० रूपये लंपास केले व हॉटेलमधील खाद्यपदार्थाची नासाडी केली. विजय राजगडे यांच्या किराणा दुकानातून ५०० रूपये रोख व तेल कॅन तर देवराव कुनघाडकर यांच्या दुकानातून ४०० रूपये चोरून नेले व सामानाची नासाडी केली. या संदर्भात धानोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या चोरट्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी दुकानदारांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Raid in seven shops