राेहयाे कुशल कामाचे पैसे मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST2021-07-21T04:24:40+5:302021-07-21T04:24:40+5:30

जोगीसाखरा : जोगीसाखरा ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या कुशल कामाचे मागील तीन वर्षांपासून पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे ट्रॅक्टरमालक अडचणीत आले ...

Raheya did not get paid for skilled work | राेहयाे कुशल कामाचे पैसे मिळेना

राेहयाे कुशल कामाचे पैसे मिळेना

जोगीसाखरा : जोगीसाखरा ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या कुशल कामाचे मागील तीन वर्षांपासून पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे ट्रॅक्टरमालक अडचणीत आले आहेत.

जोगी साखरा ग्रामपंचायत अंतर्गत सन २०१८-१९ मध्ये मग्रारोहयो योजनेतून मोरेश्वर मेश्राम ते आसाराम मोहुर्ले यांच्या शेतापर्यंतच्या पांदण रस्त्यावर ट्रॅक्टरधारकांनी ३१५ ब्राॅस मुरूम टाकला. हे काम जाेगीसाखरा येथील नरेंद्र झाडे, खुमा गरफडे, प्रमोद बगमारे, महादेव राऊत या चार ट्रॅक्टरधारकांनी केले. काम केल्याला आता तीन वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र कामाचे बिल मिळालेले नाही.

याबाबत मग्रारोहयोचे सहाय्यक अधिकारी जनबंधू यांना विचारणा केली असता सीसी रोड, मुरूम काम, अशा कुशल कामाचे पंचायत समितींतर्गत तीन ते चार काेटी रुपयांचे बिल पेंडिंग आहेत. निधी मिळाल्यानंतर टॅक्टरमालकांना दिला जाईल, असे आश्वासन दिले.

Web Title: Raheya did not get paid for skilled work