सुरजागडच्या प्रश्नावर माजी लोकप्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्यांना भेटले
By Admin | Updated: April 19, 2016 05:37 IST2016-04-19T05:37:22+5:302016-04-19T05:37:22+5:30
एटापल्ली तालुक्यात सुरजागड येथे अवैधरीत्या लोहखनिज उत्खनन व लोहखनिजाची वाहतूक करण्यात येत आहे.

सुरजागडच्या प्रश्नावर माजी लोकप्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्यांना भेटले
आलापल्ली : एटापल्ली तालुक्यात सुरजागड येथे अवैधरीत्या लोहखनिज उत्खनन व लोहखनिजाची वाहतूक करण्यात येत आहे. प्रकल्प नेमका कुठे होणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. सरकारची भूमिका याबाबत काय आहे, हे स्पष्ट न झाल्यामुळे काँग्रेसचे माजी खासदार मारोतराव कोवासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, अहेरीचे माजी आमदार दीपक आत्राम आदींनी सोमवारी जिल्हाधिकारी रणजितकुमार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी लोहखनिजाची सुरू असलेली वाहतूक बंद करण्यात यावी, एटापल्ली येथे कंपनीतर्फे जनसुनावणी तत्काळ घ्यावी, प्रकल्प जिल्ह्यात व्हावा, किती सुशिक्षीत बेरोजगारांना यात काम मिळणार आहे, याबाबत स्पष्टता व्हावी, जिल्ह्यातील आयटीआयमध्ये अगोदर प्रकल्पासाठी लागणाऱ्या ट्रेड अंतर्गत शिक्षण सुरू करण्यात यावे आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली, अशी माहिती माजी आमदार दीपक आत्राम यांनी दिली आहे. (वार्ताहर)