शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
2
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
3
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
4
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
5
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
6
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
7
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
8
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
9
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
10
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
11
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
12
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
13
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
14
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
15
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
16
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
17
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
18
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
20
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार

१३ हजार ७३५ नागरिकांचा क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 05:00 IST

खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक नागरिकाला होम क्वॉरंटाईन ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. या नागरिकांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून होते. यापैकी १३ हजार ७३५ नागरिकांनी १४ दिवसांचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. त्यापैकी एकही नागरिक सद्य:स्थितीत पॉझिटीव्ह आढळला नाही.

ठळक मुद्दे२,८७३ अजूनही निरीक्षणाखाली : एकूण १६ हजार ६०८ नागरिक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दुसऱ्या जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या एकूण १६ हजार ६०८ नागरिकांपैकी १३ हजार ७३५ नागरिकांनी १४ दिवसांचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. उर्वरित २ हजार ८७३ नागरिकांचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण व्हायचा आहे. आरोग्य विभाग त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक नागरिकाला होम क्वॉरंटाईन ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. या नागरिकांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून होते. यापैकी १३ हजार ७३५ नागरिकांनी १४ दिवसांचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. त्यापैकी एकही नागरिक सद्य:स्थितीत पॉझिटीव्ह आढळला नाही. दुसऱ्या जिल्ह्यातून आलेला, मात्र होम क्वॉरंटाईनसाठी नोंदणी न करताच एखादा नागरिक गावात फिरत असल्यास त्याची माहिती प्रशासनाला कळवावी. सामान्य व्यक्तीला आजाराची लक्षणे दिसून आली नसली तरी त्यांनी इतरांच्या संपर्कात येऊ नये. अचानक आजारी अथवा आरोग्यविषयक तक्रारी असल्यास त्यांनी आपली माहिती जवळच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.कोरोनाचा प्रसार थांबविण्याबाबत आशा वर्कर व वैद्यकीय अधिकारी रात्रंदिवस काम करीत आहेत. इतरही विभागांचे अधिकारी व कर्मचाºयांनीही स्वत:ला वाहून घेतले आहे. त्यांच्या कार्यामुळेच गडचिरोली जिल्ह्यातील परिस्थिती अजुनही नियंत्रणात आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.यांनी पुढे केला मदतीचा हातगडचिरोली येथील अभिलाष चुटे यांनी १ लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द केला. तसेच गडचिरोली येथील विजय चौधरी यांनी २५ हजार रुपये, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी २५ हजार रुपये, आरमोरी येथील प्रविण राहाटे यांनी ३ हजार रुपये तसेच फुले दाम्पत्य प्रतिष्ठान गडचिरोलीतफे १० हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द केला. हा सर्व निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार आहे. अडचणीच्या कालावधीत दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना यांनी मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.गर्दीचे कार्यक्रम घेतल्यास आयोजकावर गुन्हाकोरोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण देशात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला परवानगी दिली जाणार नसून सण, उत्सव घरीच साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. कोणी गर्दी होणारा एखादा कार्यक्रम घेतला तर आयोजकावर गुन्हा दाखल होईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.येत्या काळात हनुमान जयंती, गुड फ्रायडे, महात्मा फुले जयंती, इस्टर संडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व इतर काही सार्वजनिक उत्सवाचे कार्यक्रम येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथरोग नियंत्रण कायदा व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यास मनाई करण्यात आली आहे. नागरिकांनी घरीच उत्सव साजरे करावे, याबाबत धर्मगुरू, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना यांनी पुढाकार घेऊन नागरिकांना मार्गदर्शन करावे. कार्यक्रम आयोजित करून या ठिकाणी गर्दी झाल्यास आयोजकासह त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल. कोणालाही कार्यक्रम घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे कार्यक्रम घेण्याकरिता प्रशासनाकडे मागणी करू नये. सर्व स्तरावर संचारबंदीची यशस्वी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.गरजूंची माहिती तहसीलदारांना द्यासंचारबंदीच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू न मिळाल्याने एखादे कुटुंब किंवा नागरिक अडचणीत असेल तर याबाबतची माहिती संबंधित तहसीलदारांना द्यावी. तसेच जिल्हास्तरावर स्थापन केलेल्या मदत केंद्रावरही संपर्क साधून अडचणीत असलेल्या कुटुंबाची माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस