राजकारण्यांची लुडबूड संपल्याने गणवेशाचा दर्जा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:34 IST2021-03-24T04:34:45+5:302021-03-24T04:34:45+5:30

मागील काही दिवसांपासून सर्व शिक्षा अभियानमार्फत थेट शाळेच्या खात्यामध्ये विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा निधी जमा केला जात आहे. यामधूनही कमिशन मिळविण्यासाठी ...

The quality of the uniform increased as the politicians got involved | राजकारण्यांची लुडबूड संपल्याने गणवेशाचा दर्जा वाढला

राजकारण्यांची लुडबूड संपल्याने गणवेशाचा दर्जा वाढला

मागील काही दिवसांपासून सर्व शिक्षा अभियानमार्फत थेट शाळेच्या खात्यामध्ये विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा निधी जमा केला जात आहे. यामधूनही कमिशन मिळविण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी प्रयत्न करीत हाेते. एखाद्या दुकानदाराला हाताशी धरून तालुकाभरातील सर्वच शाळांना त्याच दुकानातून गणवेश खरेदी करण्याची सक्ती केली जात हाेती. संबंधित दुकानदार यातील काही कमिशन पदाधिकाऱ्यांना देत हाेता. मात्र मागील चार ते पाच वर्षांपासून राजकारण्यांनी गणवेश खरेदीतील लुडबूड बंद केली आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक आपल्या पद्धतीने गणवेशाचा रंग ठरवित आहेत. तसेच गणवेशासाेबत टाय, पायमाेजे, मागितले जातात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्याचा गणवेश इंग्रजी शाळेच्या विद्यार्थ्यांप्रमाणे दिसून येत आहे.

बाॅक्स ....

३०० रुपये अपुरे

सर्व शिक्षा अभियानमार्फत प्रती गणवेश ३०० रुपये दिले जातात. वाढत्या महागाईनुसार गणवेशाची किंमत वाढविणे आवश्यक आहे.

पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातात. याची माहिती उन्हाळ्यातच मागितली जाते. मात्र प्रत्यक्षात निधी जुलै महिन्याशिवाय मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गणवेश मिळण्यास कधी-कधी दिवाळीचा कालावधी जवळ येतो.

ओबीसी, एनटी प्रवर्गात माेडणाऱ्या व बीपीएल नसणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश दिला जात नाही. अशा विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमार्फत निधी दिला जातो.

काेट .......

गणवेशाचा निधी थेट शाळेच्या खात्यावर जमा केला जातो. शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक गणवेश खरेदीबाबतचा निर्णय घेतात. गणवेश खरेदीदरम्यान काेणताही पदाधिकारी हस्तक्षेप करीत नाही. त्यामुळे चांगल्या दर्जाचा गणवेश खरेदी करण्याचा प्रयत्न मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती करते. - नीलेश खाेब्रागडे, मुख्याध्यापक

बाॅक्स .....

एकूण जि. प. शाळा

१५१६

गणवेश पात्र एकूण विद्यार्थी

६१,८८७

मुली

३३,६११

मुले

२८,२७६

यावर्षी मिळालेला निधी

१,८५,६६,१००

Web Title: The quality of the uniform increased as the politicians got involved