शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

पाच दिवसांपासून धान खरेदी बंद

By admin | Updated: January 5, 2015 23:04 IST

स्थानिक आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या धान खरेदी केंद्रावर धानाची खरेदी मागील पाच दिवसांपासून बंद पडली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाले

सिरोंचा : स्थानिक आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या धान खरेदी केंद्रावर धानाची खरेदी मागील पाच दिवसांपासून बंद पडली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाले असून धान खरेदी तत्काळ सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.सिरोंचा परिसरातील हे एकमेव धान खरेदी केंद्र असल्याने शेकडो शेतकरी हजारो क्विंटल धान विक्रीसाठी सिरोंचा येथील धान खरेदी केंद्रावर आणतात. मात्र आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे सचिव व अध्यक्ष यांच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणची धान खरेदी मागील पाच दिवसांपासून बंद पडली आहे. शेतकऱ्यांनी आणलेले धान केंद्राच्या परिसरात अस्ताव्यस्त पडून आहेत. या धानावर परिसरातील डुकर, गायी, बकऱ्या डल्ला मारत आहेत. यामुळे शेतकऱ्याचे प्रतिदिवस किमान २०० ते ३०० रूपयांचे नुकसान होत आहे. या ठिकाणी धान ठेवण्यासाठी व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांनी धान उघड्यावरच ठेवले होते. तीन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे सदर धान भिजले. भिजलेले धान आता संस्था घेण्यास तयार नाही. त्यामुळे भिजलेले धान न्यावे कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. बहुतांश शेतकरी सावकार व बँकेकडून कर्ज काढून धानाची शेती केली. त्यांचे कर्ज देण्यासाठी फेडण्यासाठीच धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी आणले. मात्र येथील सचिव व अध्यक्षाच्या मनमानी कारभारामुळे बारदाना उपलब्ध असतानाही धान खरेदी बंद ठेवली जात आहे. शेतकऱ्यांनी आणलेल्या दिवशीय धान खरेदी केली असती तर या नुकसानीपासून शेतकरी वाचू शकले असते. पुढील तोटा कमी करण्यासाठी संस्थेने धान खरेदी सुरू करावी, अशी मागणी रायुकाँचे तालुकाध्यक्ष सतिश भोगे, गादे, मेहरा, दाया पोचम, वासकुरी सत्यम, नुसेद्दी शंकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)