५८,८,२३४ क्विंटल धान खरेदी

By Admin | Updated: June 7, 2014 23:56 IST2014-06-07T23:56:47+5:302014-06-07T23:56:47+5:30

शासनाच्या किमान आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत यंदा ९ मे २0१४ अखेरपर्यंत मार्केटींग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत एकूण ५८ लाख ८ हजार २३४ क्विंटल धान्य खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे.

Purchase 58,8234 quintals of rice | ५८,८,२३४ क्विंटल धान खरेदी

५८,८,२३४ क्विंटल धान खरेदी

९ मे पर्यंत चालली खरेदी : किमान आधारभूत खरेदी योजना
गडचिरोली : शासनाच्या किमान आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत यंदा ९ मे २0१४ अखेरपर्यंत मार्केटींग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत एकूण ५८ लाख ८ हजार २३४ क्विंटल धान्य खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे.
शासनाच्यावतीने दरवर्षी जिल्ह्यात शेतकर्‍यांनी सोयीचे व्हावे याकरीता किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदी केल्या जाते. यावर्षी धानाला १ हजार ३१0 रूपये प्रती क्विंटल भाव देण्यात आला होता. या भावाने जिह्यातील शेतकर्‍यांनी स्टेट को. ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय गडचिरोली व अहेरी येथील विविध खरेदी केंद्रावर धान नेऊन विक्री केली. यापूर्वी खरेदी करण्यात आलेलाही धान महामंडळाकडे मोठय़ा प्रमाणात होता. परिणामी महामंडळापुढे पुरेशा गोदामाअभावी धान साठवणुकीची समस्या निर्माण झाली.
किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत यावर्षी जिल्ह्यात १ नोव्हेंबर २0१३ ते ९ मे २0१४ या कालावधीत धान खरेदी करण्यात आली. स्टेट को. ऑपरेटींग मार्केटींग  फेडरेशन गडचिरोली अधिनस्त असलेल्या गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी, विवेकानंदपूर, आष्टी, येनापूर या ७ केंद्रावर मिळून एकूण ५३८८३.६0 क्विंटल धान खरेदी करण्यात आली. आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक व्यवस्थापक गडचिरोली कार्यालयाच्या एकूण ५६ केंद्रावरून एकूण ३२९४४६.३0 क्विंटल तसेच अहेरी व्यवस्थापक कार्यालयाच्या एकूण ३२ केंद्रावरून २0४९0४.८६ क्विंटल धान खरेदी करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Purchase 58,8234 quintals of rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.