कोरचीतील तीन दुकानांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:36 IST2021-04-17T04:36:48+5:302021-04-17T04:36:48+5:30
कोरोना विषाणूचा संसर्ग राेखण्यासाठी संचारबंदी आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकल्यास कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याचे समोर आले आहे. ...

कोरचीतील तीन दुकानांवर दंडात्मक कारवाई
कोरोना विषाणूचा संसर्ग राेखण्यासाठी संचारबंदी आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकल्यास कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे पानठेले बंद ठेवण्याचे व किराणा दुकानातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत तंबाखूजन पदार्थांची विक्री सुरूच आहे. नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदार भंडारी यांनी शहरी व ग्रामीण भागात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व उघड्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. या पथकाच्या माध्यमातून कोरची शहरातील एकूण १२ किराणा दुकानांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, तीन दुकानांमध्ये ६४० रुपये किमतीचे सिगारेट पॉकेट, ३ हजार रुपयांची बिडी, ३ रुपयांचा तंबाखू, ६०० रुपयांची तपकीर व २७० रुपयांचा सुगंधित तंबाखू आढळून आला. सदर माल पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी तिन्ही दुकानदारांवर एकूण ६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यानंतर जप्त करण्यात आलेला मुद्देमाल नगरपंचायतमध्ये जमा करुन होळी करण्यात आली. या मोहिमेत पोलीस विभागाचे कर्मचारी हेमंत ताटपलान, प्रवेश राऊत, नगरपंचायत कर्मचारी व मुक्तिपथ चमू सहभागी झाले.
===Photopath===
160421\16gad_2_16042021_30.jpg
===Caption===
तंबाखूजन्य पदार्थ नष्ट करताना न.पं., पोलीस कर्मचारी व मुक्तिपथ चमू.