तलावात पक्के अतिक्रमण
By Admin | Updated: December 15, 2014 22:55 IST2014-12-15T22:55:02+5:302014-12-15T22:55:02+5:30
जिल्हा मुख्यालयी गडचिरोली येथे गोकुलनगरलगत असलेल्या एकमेव तलावात गेल्या दोन-तीन वर्षांपासून जोमात अतिक्रमण सुरू आहे. विशेष म्हणजे शहरातील अनेक सदन नागरिक आयती जागा

तलावात पक्के अतिक्रमण
पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष : घर बांधून विकण्याचा गोरखधंदा वाढला
गडचिरोली : जिल्हा मुख्यालयी गडचिरोली येथे गोकुलनगरलगत असलेल्या एकमेव तलावात गेल्या दोन-तीन वर्षांपासून जोमात अतिक्रमण सुरू आहे. विशेष म्हणजे शहरातील अनेक सदन नागरिक आयती जागा मिळत असल्याच्या हव्याशावरून तलावातील जागेवर अतिक्रमण करीत आहेत. अनेकांनी तलावात पक्के घर बांधले आहेत. तर काही नागरिक तयार झालेले घर मोठ्या किंमतीने विकण्याचा सपाटा सुरू केला आहे. मात्र याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
शहरात गोकुलनगरलगत असलेला तलाव पाटबंधारे (सिंचाई) विभागाच्या हद्दीत येते. जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या पर्यावरण व परिस्थितीच्या निधीतून गेल्या वर्षभरापासून या तलावाच्या सौदर्यीकरणाचे काम खासगी कंत्राटदारांमार्फत कासवगतीने सुरू आहे. गोकुलनगरलगत या तलावाचे सौंदर्यीकरण करून पर्यटन विकासाला चालना द्यावी, अशी एक मोठी मागणी शहरातील जनतेनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूर केला. मात्र या तलावावर देखभाल व व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण कार्य योग्यरितीने पार पाडल्या जात नसल्याने येत्या काही वर्षात अतिक्रमणामुळे सदर तलाव संपूर्ण गिळंकृत होण्यास वेळ लागणार नाही. परिणामी शहरवासीयांसाठी फिरण्याकरीता प्रशस्त जागा शिल्लक राहणार नाही. सिंचाई विभागाच्या अधिनस्त सदर तलाव असल्यामुळे या तलावाच्या देखभाल व व्यवस्थापनाकडे नगर पालिका प्रशासनाचे काही नियंत्रण नाही. सद्य:स्थितीत गोकुलनगरलगतच्या तलावात १०० हून अधिक नागरिकांनी अतिक्रमण करून पक्के घर बांधल्याचे दिसून येते. यामुळे तलावातील पाण्याचे पात्र कमी झाले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)