ठाणेगावात अवैध धंद्यांविरोधात जनजागृती रॅली
By Admin | Updated: March 23, 2015 01:23 IST2015-03-23T01:23:32+5:302015-03-23T01:23:32+5:30
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व्यसनमुक्ती समिती ठाणेगावच्या वतीने आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे अवैध धंद्याविरोधात व्यसनमुक्ती रॅली शनिवारी काढण्यात आली.

ठाणेगावात अवैध धंद्यांविरोधात जनजागृती रॅली
ठाणेगाव : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व्यसनमुक्ती समिती ठाणेगावच्या वतीने आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे अवैध धंद्याविरोधात व्यसनमुक्ती रॅली शनिवारी काढण्यात आली. ठाणेगाव येथील महिलांनी पार पडलेल्या ग्रामसभेत अवैध धंदे बंद करण्याचा ठराव पारित केला. गुढीपाडव्यापासून गावातील अवैध दारू बंद झाली पाहिजे, जुगार सट्टापट्टी आदी अवैध धंदे बंद झाले पाहिजे, अशी नारेबाजी करीत महिलांनी जनजागृती केली. १५ महिनाभरात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व्यसनमुक्ती समितीच्या वतीने गावातील दारू दोनदा पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. गावात काढण्यात आलेल्या व्यसनमुक्ती रॅलीचे नेतृत्व दारूबंदी समितीच्या अध्यक्षा शारदा लक्षणे यांनी केले. या रॅलीत शारदा लटारे, सुमन कुकुडकर, सीताबाई शेटे, आनंदाबाई कुथे, मीनाबाई जुवारे, कमलाबाई मेश्राम, लीला उपरीकर, कविता कुकुडकर, विमल शेटे, जयश्री चापले, मनीषा तोरणकर, उषा इनकने आदीसह गावातील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी संघटितपणे अवैध धंद्याविरोधात जनजागृती मोहीम सुरू केल्यामुळे दारूबंदी प्रत्यक्षात बंद होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (वार्ताहर)