शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

माओवाद्यांच्या स्टाईलने पत्रकातून पोलिसांची दुर्गम भागात जनजागृती

By admin | Updated: September 24, 2015 01:53 IST

माओवादी पत्रक व बॅनर दुर्गम भागात लावून माओवादी संघटनेच्या कार्यक्रमांची तसेच शासनाच्या विरोधातील विखारी प्रचाराची जनजागृती करीत असतात.

नक्षल्यांना सडेतोड उत्तर : शासनाच्या योजनांची देत आहे माहितीगडचिरोली : माओवादी पत्रक व बॅनर दुर्गम भागात लावून माओवादी संघटनेच्या कार्यक्रमांची तसेच शासनाच्या विरोधातील विखारी प्रचाराची जनजागृती करीत असतात. अनेकदा नक्षल्यांच्या पत्रकबाजीमुळे दुर्गम भागातील वातावरण दहशतीत येते, अशीच नीती आता पोलिसांनी अवलंबिली असून पोलीसही असेच पत्रक लावून सरकारच्या योजनांचा प्रचार दुर्गम भागात करू लागले आहे. याचा चांगला परिणाम लोकांमध्ये दिसून येत आहे. नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या विरोधात नेहमीच पत्रकातून जनजागृती करून लोकांमध्ये खोटा प्रचार करण्याची भूमिका अवलंबिली आहे. पोलीस चकमकीनंतर माओवादी पत्रक काढून पोलिसांवर टीका करतात. तसेच वेळोवेळी माओवादी संघटनांच्या कार्यक्रमांची माहिती पत्रकातूनच दिली जाते. लाल रंगाच्या कापडावर पांढऱ्या अक्षरात लिहिलेले हे बॅनर ग्रामीण व दुर्गम भागात लागले की, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होते हा आजवरचा अनुभव राहिलेला आहे. याचा मोठा परिणाम जनजीवनावर होतो. हीच निती आता पोलिसांनी अवलंबिली आहे. पोलिसांनीही असेच बॅनर व पत्रक छापून अतिदुर्गम भागात प्रदर्शित करणे सुरू केले आहे. अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात शासनाच्या लोक कल्याणकारी धोरणाचा परिणाम या मथळ्याखाली छायाचित्रासह पोस्टर लावलेले आहे. यातून शासनाच्या चांगल्या योजनांची देण्यात आली आहे. ग्रामीण भागात पोलीस व नक्षल यांच्या पत्रकांचे युध्द जोरदार तापले असून नागरिकांना आता पोलिसांचे पत्रक म्हणून याची ओळख होऊ लागली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील रूजू झाल्यापासून त्यांनी या नितीचा अवलंब प्रकर्षाने सुरू केल्याने ग्रामीण भागात पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून सरकारचे काम लोकांना दिसून येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)