६८ हजार नागरिकांमध्ये जनजागृती
By Admin | Updated: December 24, 2014 23:00 IST2014-12-24T23:00:20+5:302014-12-24T23:00:20+5:30
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान जिल्हा परिषद आरोग्य विभाग व एकता सामाजिक संस्थेच्यावतीने सिलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सिकलसेल सप्ताहानिमित्त आपापल्या कार्यक्षेत्रात

६८ हजार नागरिकांमध्ये जनजागृती
सिकलसेल सप्ताहादरम्यान उपक्रम
गडचिरोली : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान जिल्हा परिषद आरोग्य विभाग व एकता सामाजिक संस्थेच्यावतीने सिलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सिकलसेल सप्ताहानिमित्त आपापल्या कार्यक्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून ६८ हजार ७०४ लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यातील आरमोरी, धानोरा, गडचिरोली, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा तालुक्यातील २३ प्राथमिक आरोग्य केंद्र, ४ ग्रामीण रूग्णालय, एक उपजिल्हा रूग्णालय व जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात आला. सिकलसेल आजाराविषयी जनजागृती करण्याची कार्यवाही प्रभावीपणे करण्यात आली. सिकलसेल सप्ताहानिमित्त कार्यक्षेत्रात १४८ गटसभा, ३७ जनजागृती रॅली, ६० चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सिकलसेलग्रस्त रूग्णांची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यासाठी शिबिरांचे आयोजन करून समुपदेशन करण्यात आले. अंमलबजावणीसाठी जिल्हा समन्वयिका रचना फुलझेले, प्रकल्प संचालक प्रकाश अर्जुनवार, व्यवस्थापक शास्त्रकार, पर्यवेक्षक सत्तू तिम्मा, जाकीर अली, तपोष बिश्वास, प्रफुल उंदीरवाडे, अविनाश हुलके, गुणवंत गराडे यांनी सहकार्य केले.
गडचिरोली जिल्ह्यात सिकलसेलचे हजारो रूग्ण आहेत. विशेष खबरदारी घेतल्यास पुढची पिढी सिकलसेलपासून मुक्त ठेवण्यास मदत होईल, त्याचबरोबर सिकलसेल रूग्णाला सिकलसेल आजाराबाबत योग्य मार्गदर्शन केले. एकता सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकांनी दुर्गम भागातील नागरिकांमध्ये जनजागृती केली. (शहर प्रतिनिधी)