काेविड रुग्णांसाठी ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटरची साेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:23 IST2021-06-21T04:23:58+5:302021-06-21T04:23:58+5:30
लोकसभा क्षेत्रातील आरमोरी, देसाईगंज, कोरची, देवरी, आमगाव, सालेकसा, सावली, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, चिमूर, गडचिरोली व धानोरा आदी तालुक्यामध्ये ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर ...

काेविड रुग्णांसाठी ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटरची साेय
लोकसभा क्षेत्रातील आरमोरी, देसाईगंज, कोरची, देवरी, आमगाव, सालेकसा, सावली, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, चिमूर, गडचिरोली व धानोरा आदी तालुक्यामध्ये ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले असून, त्याद्वारे कोरोनाबाधित मात्र गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनची सुविधा मिळणार आहे. तसेच गडचिरोली येथे खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध असून, आजपर्यंत अनेक नागरिकांना निःशुल्क ऑक्सिजनचा लाभ देण्यात आला. यात नवेगाव (मुरखळा), रामनगर, आरमोरी विधानसभा, ठाकूरनगर, डोंगरगाव, बसेरा कॉलनी, गडचिरोली, गांधी वॉर्ड, गडचिरोली, संताजीनगर आदी दी वॉर्डातील रुग्णांना जनसंपर्क कार्यालयामार्फत निःशुल्क ऑक्सिजन पुरविण्यात आले आहे. ऑक्सिजन पुरवठा अविरत सुरू असून गरजू नागरिकांनी ऑक्सिजन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
===Photopath===
200621\20gad_2_20062021_30.jpg
===Caption===
रुग्णालयासाठी अधिकाऱ्यांकडे मशीन सुपूर्द करताना खा. अशाेक नेते.