१० लाभार्थ्यांना अर्थसहाय्य प्रदान

By Admin | Updated: March 12, 2017 02:10 IST2017-03-12T02:10:20+5:302017-03-12T02:10:20+5:30

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत तहसील कार्यालय चामोर्शीच्या वतीने १० निराधार लाभार्थ्यांचे अर्ज

Providing financial assistance to 10 beneficiaries | १० लाभार्थ्यांना अर्थसहाय्य प्रदान

१० लाभार्थ्यांना अर्थसहाय्य प्रदान

निराधारांना दिलासा : प्रत्येकी २० हजारांचा धनादेश
चामोर्शी : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत तहसील कार्यालय चामोर्शीच्या वतीने १० निराधार लाभार्थ्यांचे अर्ज प्रकरणे मंजूर करून त्यांना प्रत्येकी २० हजार रूपयांचा धनादेश तहसीलदार अरूण येरचे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
लाभार्थ्यांमध्ये शांतीराणी खोकण बिश्वास रा. नेताजी नगर, मायाबाई बंडू वासेकर रा. कुनघाडा रै. रेखा प्रकाश कोरडे रा. फोकुर्डी, सुवर्णा धनराज नैताम रा. चामोर्शी, मिराबाई किरण झुरी रा. पुसेर, रेखाबाई श्यामराव वाढई रा. जामगिरी, मिनाबाई मोहन परचाके रा. मार्र्कंडादेव, मिना देवाशीष बॅनर्जी रा. दुर्गापूर, पार्वती मुकूल बासी रा. ठाकूर नगर व उषाताई राजू बावणे रा. आष्टी यांचा समावेश आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील कमावता पुरूष मृत्यू पावल्यास त्यांना या योजनेंतर्गत लाभ दिला जातो. तहसील कार्यालयातर्फे १० मार्चला १० निराधार लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजारांचा धनादेश देण्यात आला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Providing financial assistance to 10 beneficiaries