पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी योग्य प्रशिक्षण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 06:00 AM2019-12-07T06:00:00+5:302019-12-07T06:00:20+5:30

ग्रामसभांचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्व.डॉ. ब्रह्मदेव शर्मा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शुक्रवार ६ डिसेंबर रोजी घोडेझरी येथे ग्रामसभांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन केले होते. खुटगाव आणि झाडा भापडा इलाख्याच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात पेसा आणि वनहक्क कायदा-माहिती व अंमलबजावणी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

Provide proper training for paid law enforcement | पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी योग्य प्रशिक्षण द्या

पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी योग्य प्रशिक्षण द्या

googlenewsNext
ठळक मुद्दे१० इलाख्यातील ग्रामसभांची अपेक्षा : पेसाचे जनक डॉ.ब्रह्मदेव शर्मा यांच्या पुण्यतिथीनिमित्त घोडेझरीत कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामसभांना पेसा कायद्याचा अधिकार मिळाला असला तरी अंमलबजावणी झाली का? होत आहे का? याबाबत ग्रामसभेची भूमिका काय? या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शुक्रवारी धानोरा तालुक्यातील घोडेझरी येथे १० इलाख्यातील ग्रामसभांचा मेळावा झाला. यात पेसा कायद्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी संपूर्ण जिल्ह्यात कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून प्रशिक्षण मिळावे, अशी अपेक्षा इलाख्यांचे मार्गदर्शक देवाजी पदा व इतर वक्त्यांनी व्यक्त केली.
ग्रामसभांचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्व.डॉ. ब्रह्मदेव शर्मा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शुक्रवार ६ डिसेंबर रोजी घोडेझरी येथे ग्रामसभांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन केले होते. खुटगाव आणि झाडा भापडा इलाख्याच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात पेसा आणि वनहक्क कायदा-माहिती व अंमलबजावणी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना पदा म्हणाले, स्व.डॉ.शर्मा यांनी आदिवासी समाजाचे शोषण कमी करून त्यांना मिळालेले हक्क त्यांच्यापर्यंत पोहोचवावे याकरिता प्रशिक्षण, आंदोलने, मेळावे, धरणे, उपोषणे करून ‘मावा नाटे, मावा राज’ ही घोषणा देऊन आदिवासींचे अधिकार व हक्काची जाणीव करून त्यांच्यात नवचैतन्य निर्माण केले. पेसा व वनहक्क कायदा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. परंतू सध्यातरी लोक तेंदू मंजुरी व बोनस एवढ्यापुरताच विचार करत आहेत. त्याच्या पुढे पेसा कायदा लोकांना समजावून देण्याची गरज असल्याचे पदा म्हणाले. ग्रामसभा सक्षम करणे महत्वाचे आहे. गेल्या १५ वर्षांपासून घोडेझरी ग्रामसभा पेसा कायदा प्रशिक्षणाचा छोटोसा प्रयत्न करत आहे. परंतू हा प्रयत्न पुरेसा नसून संपूर्ण जिल्ह्यात अधिक प्रमाणात वाढविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील खुटगाव, झाडा भापडा, भामरागड, पोटेगाव, दूधमाळा, धानोरा, एटापल्ली व जारावंडी या १० इलाख्यातील जवळपास २ हजार लोक उपस्थित होते. त्यात माजी, पोनवो, गायता आणि भूम्यांसह महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती.

पारंपरिक आदिवासी नृत्याचे सादरीकरण
यावेळी घोडेझरी येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी सर्व उपस्थित पाहुण्यांचे बांबूपासून निर्मित सुंदर फुलांनी स्वागत केले. तसेच यावेळी आदिवासी पारंपरिक ढोलवाद्यासह युवक-युवतींनी नृत्य सादर केले. मेळाव्याला सुरूवात करण्यापूर्वी शीलालेख पुजा व इतरही कार्यक्रम झाले.

असे आहे डॉ.शर्मा यांचे गडचिरोलीत योगदान
माजी आयएएस अधिकारी स्व.ब्रह्मदेव शर्मा यांनी सेवानिवृत्तीनंतर आदिम जाती आणि अनुसूचित जाती आयुक्त या पदावर नि:शुल्क का केले. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींकरिता त्यांनी पेसा व वनहक्क कायद्याबाबत मेळाव्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती केली. त्यांनी गावागावात गावगणराज्याची स्थापना केली. यातून आदिवासींना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली.

Web Title: Provide proper training for paid law enforcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.