निराधारांचे अनुदान ग्रामपंचायत पातळीवर उपलब्ध करून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:37 IST2021-05-09T04:37:59+5:302021-05-09T04:37:59+5:30
अहेरी तालुक्यातील संजय गांधी, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ, विधवा, अपंग, श्रावणबाळ सेवा योजनातील पात्र लाभार्थ्यांचे अनुदान अहेरी व आलापल्ली ...

निराधारांचे अनुदान ग्रामपंचायत पातळीवर उपलब्ध करून द्या
अहेरी तालुक्यातील संजय गांधी, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ, विधवा, अपंग, श्रावणबाळ सेवा योजनातील पात्र लाभार्थ्यांचे अनुदान अहेरी व आलापल्ली येथील बँकेत जमा केले जाते. आता बँकेतून अनुदानाची रक्कम दिले जात आहे.
मात्र राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे संचारबंदी असल्याने बससेवा व खासगी वाहने बंद असल्याने लाभार्थीना आवागमनासाठी अडचण निर्माण होत आहे. बँकेची वेळ निश्चित असल्याने फार मोठी रांग लावावी लागत आहे. तसेच ६०० ते ९०० रुपयांसाठी दोनशे ते तीनशे रुपयाचा आर्थिक भुर्दंड लाभार्थ्यांना बसत आहे.
बँकेकडे बँकमित्र, महसूल विभागातील कर्मचारी किंवा ग्रामपंचायत अंतर्गत संगणक परिचालक, रोजगार सेवक ग्रामपंचायत शिपाई, कर्मचारी उपलब्ध आहेत. ग्रामपंचायत निहाय यादी उपलब्ध करून देऊन सदर अनुदान वाटप केल्यास योग्य होईल. त्यामुळे सदर अनुदान ग्रामपंचायत ठिकाणी उपलब्ध करून देण्याची मागणी सभापती तलांडे यांनी केली आहे.