गोटूलसाठी वनविभाग जागा देणार

By Admin | Updated: January 5, 2016 01:49 IST2016-01-05T01:49:55+5:302016-01-05T01:49:55+5:30

गडचिरोली येथील चांदाळा मार्गावरील वन विभागाच्या सहा हेक्टर जागेवर अतिक्रमण करून आदिवासी देवी-देवतांची

Provide forest areas for Gotul | गोटूलसाठी वनविभाग जागा देणार

गोटूलसाठी वनविभाग जागा देणार

गडचिरोली : गडचिरोली येथील चांदाळा मार्गावरील वन विभागाच्या सहा हेक्टर जागेवर अतिक्रमण करून आदिवासी देवी-देवतांची महापूजा व आदिवासी मेळावा आयोजित करून विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. सदर वन विभागाची जागा गोटुल समितीला देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आ. डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला दिले.
आ. डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने वनमंत्री मुनगंटीवार यांची भेट घेऊन सदर जागा मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी गोटुल समितीचे जिल्हाध्यक्ष नंदू नरोटे, माजी जि. प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, अ‍ॅड. प्रमोद बोरावार, मोहन पुराम, गजानन कुमरे, निखिल मानकर उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Provide forest areas for Gotul