रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्या
By Admin | Updated: February 26, 2015 01:30 IST2015-02-26T01:30:01+5:302015-02-26T01:30:01+5:30
स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांना येत असलेल्या अडीअडचणींची सोडवणूक करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेतील प्रत्येक कर्मचाऱ्याने ...

रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्या
देसाईगंज : स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांना येत असलेल्या अडीअडचणींची सोडवणूक करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेतील प्रत्येक कर्मचाऱ्याने लोकांना सहकार्य करण्याचे धोरण अंगीकारावे, असे निर्देश आ. क्रिष्णा गजबे यांनी दिले.
देसाईगंज येथे पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आ. क्रिष्णा गजबे होते. यावेळी बैठकीला पं. स. च्या सभापती प्रीती शंभरकर, उपसभापती नितीन राऊत, जि. प. सदस्य पल्लवी लाडे, रेखा मडावी, पं. स. सदस्य शिवाजी राऊत, शांताबाई तितीरमारे, जास्वंदा मडावी, संवर्ग विकास अधिकारी चंद्रमनी मोडक, तहसीलदार अजय चरडे व शासनाच्या विविध विभागातील विभाग प्रमुख, ग्रामसेवक व परिसरातील गावातील सरपंच व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.