ओबीसी आरक्षणासाठी एम्पिरिकल डाटा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:41 IST2021-08-12T04:41:28+5:302021-08-12T04:41:28+5:30

गडचिराेली : जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी एम्पिरिकल डाटा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी गडचिराेली जिल्हा काॅंग्रेस कमिटी ओबीसी ...

Provide empirical data for OBC reservations | ओबीसी आरक्षणासाठी एम्पिरिकल डाटा द्या

ओबीसी आरक्षणासाठी एम्पिरिकल डाटा द्या

गडचिराेली : जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी एम्पिरिकल डाटा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी गडचिराेली जिल्हा काॅंग्रेस कमिटी ओबीसी सेलच्या मार्फत करण्यात आली आहे. क्रांतिदिनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान यांना पाठविण्यात आले.

भारत सरकारकडे २००७ ते २०१४ पर्यंत ओबीसींबाबतचा एम्पिरिकल डाटा उपलब्ध आहे. ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी यापूर्वी सुप्रिम काेर्टाकडे याचिका दाखल करण्यात आली हाेती. त्यावेळी सुप्रिम काेर्टाने एम्पिरिकल डाटाची मागणी केली हाेती. केंद्र शासनाने हा डाटा उपलब्ध करून दिल्यास ओबीसींचे आरक्षण पूर्ववत हाेण्यास मदत हाेईल. डाटा उपलब्ध न झाल्यास दिल्ली येथे ओबीसींचा माेर्चा काढण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात जेलभराे आंदाेलन केले जाईल. तिसऱ्या टप्प्यात जलसमाधी घेऊन आंदाेलन केले जाईल. चवथ्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर बेमुदत उपाेषण केले जाईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे. निवेदन देतेवेळी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. डाॅ. नामदेव उसेंडी, युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घाेटेकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, राकेश रत्नावार, सुनील चटगुलवार, काशीनाथ भडके, प्रभाकर वासेकर, देवाजी साेनटक्के, भास्कर नरुले, घनश्याम वाढई, नामदेव उडाण, सुभाष धाईत, तुषार निकुरे, नितेश गेडाम, जितेंद्र मुनघाटे, एजाज शेख, नेताजी गावतुरे आदी उपस्थित हाेते.

Web Title: Provide empirical data for OBC reservations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.