जिल्हा महिला काँग्रेसने केला ‘त्या’ माजी नेत्याचा निषेध
By Admin | Updated: July 6, 2017 01:38 IST2017-07-06T01:38:19+5:302017-07-06T01:38:19+5:30
भाजपचा माजी जिल्हा सरचिटणीस व आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळलेल्या,

जिल्हा महिला काँग्रेसने केला ‘त्या’ माजी नेत्याचा निषेध
बावनथडेवर कठोर कारवाई करा : इंदिरा गांधी चौकात निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भाजपचा माजी जिल्हा सरचिटणीस व आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळलेल्या, तथा पेशाने शिक्षक असलेल्या रवींद्र बावणथडे याने एका खासगी बसमध्ये एका युवतीशी अश्लिल चाळे करून आपल्या पेशाला काळीमा फासली. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी करीत सदर प्रकाराचा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी येथील इंदिरा गांधी चौकात निषेध करण्यात आला.
जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष भावना वानखेडे यांच्या नेतृत्वात महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बावणथडेच्या कृत्याचा घोषणाबाजीतून निषेध केला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष भावना वानखेडे, जिल्ह्याच्या निरिक्षक नंदा अल्लुरवार, चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, गडचिरोली तालुका अध्यक्ष ज्योती गव्हाणे, जिल्हा उपाध्यक्ष कल्पना नंदेश्वर, वर्षा गुळदेवकर, पौर्णिमा भडके, पुष्पा ब्राह्मणवाडे, आशा मेश्राम, दीपा माळवणकर, सुवर्णा उराडे, नंदा माळवणकर, उषा आत्राम, सुमन उंदीरवाडे, पुष्पा चौधरी, गीता बोरकर, अरूणा गेडाम, बबीता घरडे, वर्षा दांडेकर, यमाबाई पोटावी, शामलता बडवाईक, गंगू कुंभरे, प्रमिला सिडाम, सविता सोक्शा, निराशा सेलोटे आदी उपस्थित होत्या.
लोकशाहीला काळीमा फासणारे कृत्य
या निवेदनात महिला काँग्रेसने म्हटले आहे की, सत्तेत असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची दादागिरी वाढली आहे. त्यामुळेच भाजपशी जुळलेल्या लोकांकडून अशा प्रकारचे अशोभनिय कृत्य होत आहे. अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्याची ही घटना लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे बावणथडेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून महिला काँग्रेसने केली आहे.