गडचिराेलीपासून १० किमीच्या परिघात काेंबड्यांच्या विक्रीवर प्रतिबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST2021-01-16T04:40:57+5:302021-01-16T04:40:57+5:30

गडचिराेली शहरातील फुले वाॅर्डातील एका कुक्कुट पालन केंद्रातील १०० काेंबड्यांपैकी तीन काेंबड्या मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांचे नमुने नागपूर विभागीय ...

Prohibition on sale of goats within a radius of 10 km from Gadchiraeli | गडचिराेलीपासून १० किमीच्या परिघात काेंबड्यांच्या विक्रीवर प्रतिबंध

गडचिराेलीपासून १० किमीच्या परिघात काेंबड्यांच्या विक्रीवर प्रतिबंध

गडचिराेली शहरातील फुले वाॅर्डातील एका कुक्कुट पालन केंद्रातील १०० काेंबड्यांपैकी तीन काेंबड्या मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांचे नमुने नागपूर विभागीय प्रयाेगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचा मृत्यू नेमक्या काेणत्या राेगामुळे झाला, याबाबतचा निष्कर्ष अजूनपर्यंत प्राप्त झाला नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून फुले वाॅर्डातील सर्वेक्षणाचे काम पूर्ण हाेईपर्यंत गडचिराेली शहरपासून १० किमी अंतराच्या परिघात काेंबड्या तसेच इतर पक्ष्यांची विक्री, खरेदी, वाहतूक, बाजार यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.

फुले वाॅर्ड प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घाेषित करण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध राहणार आहेत. आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था व समूहांवर साथराेग प्रतिबंध कायदा १८९७ अन्वये कारवाई केली जाईल, असे प्रभारी जिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी कळविले आहे.

Web Title: Prohibition on sale of goats within a radius of 10 km from Gadchiraeli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.