राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:18 IST2018-02-19T00:17:21+5:302018-02-19T00:18:33+5:30
महाराष्ट्राचे आराध्य दैैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे अहमदनगर येथील भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शनिवारी निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : महाराष्ट्राचे आराध्य दैैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे अहमदनगर येथील भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शनिवारी निषेध करण्यात आला. इंदिरा गांधी चौकात निदर्शने करून छिंदम यांच्या वक्तव्याचा विरोध करण्यात आला.
अहमदनगर येथील भारतीय जनता पार्टीचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यासह विविध ठिकाणी निदर्शने करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध व विरोध करण्यात आला.
गडचिरोली येथे निषेध नोंदविताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, रायुकाँ जिल्हाध्यक्ष प्रा. रिंकू पापडकर, राविकाँ जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, जगन जांभुळकर, अक्षय बोकडे, नितीन गंगवानी, प्रशांत म्हशाखेत्री, विवेक बाबनवाडे, अंकूश मामीडवार, संजय शिंगाडे, मधुकर रेवाडे, अक्षय मेडेवार, हिमांशू खरवडे, मनोज जेंगठे, प्रशांत चलाख, अक्षय खोब्रागडे, संजय कोत्ते, राजू डांगेवार उपस्थित होते.