कोरेगाव-भीमा दंगलीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:18 IST2018-01-06T00:17:45+5:302018-01-06T00:18:15+5:30
पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी रोजी श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी जात असलेल्या आंबेडकरी जनतेवर हल्ला करून दंगल घडवून आणल्याच्या निषेधार्थ एटापल्ली तालुक्यातील १४ गावातील नागरिकांनी एकत्र येत निषेध रॅली काढली.

कोरेगाव-भीमा दंगलीचा निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी रोजी श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी जात असलेल्या आंबेडकरी जनतेवर हल्ला करून दंगल घडवून आणल्याच्या निषेधार्थ एटापल्ली तालुक्यातील १४ गावातील नागरिकांनी एकत्र येत निषेध रॅली काढली. भारतीय बौध्द धम्म प्रचारक मंडळ एटापल्ली व रमाई बहुउद्देशिय संस्था एटापल्लीच्या नेतृत्वात शुक्रवारी एटापल्ली शहरातून निषेध रॅली काढण्यात आली.
यानंतर एटापल्ली येथील बुध्द विहारात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. बुध्द विहारातून निषेध रॅलीला सुरूवात करण्यात आली. हातात पंचशिल तसेच निळे ध्वज घेवून घोषणांच्या निनादात शिवाजी चौक, बसस्थानक, पंचायत समिती संकुल अशा मार्गाने रॅली तहसील कार्यालयावर पोहोचली. दंगल घडवून आणणाºया दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. निषेध रॅली तहसील कार्यालयावर पोहचल्यानंतर तहसीलदार मनिष धेटे यांनी रॅलीसमोर येऊन निवेदन स्वीकारले. निषेध सभेला प्रा. किशोर बुरबुरे यांनी संबोधित केले. संचालन किशोर खोब्रागडे यांनी केले.
पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारीला उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद गडचिरोली जिल्ह्यात बुधवारपासून दोन ते तीन दिवस उमटले. विविध राजकीय पक्ष व आंबेडकरी संघटनांच्या वतीने जिल्हाभरात बुधवारी व गुरूवारी अनेक ठिकाणी सर्व दुकाने, शाळा, महाविद्यालये, पानठेले बंद करून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. शुक्रवारीही जिल्ह्याच्या काही भागात दंगलीचा निषेध करण्यात आला.