विदर्भवादी काळीफित लावून करणार निषेध
By Admin | Updated: April 30, 2016 01:28 IST2016-04-30T01:28:05+5:302016-04-30T01:28:05+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी गडचिरोली येथे विदर्भवाद्यांकडून स्वतंत्र विदर्भ राज्याचे ध्वजारोहण महाराष्ट्रदिनी केले जाणार आहे.

विदर्भवादी काळीफित लावून करणार निषेध
महाराष्ट्र दिन : स्वतंत्र विदर्भ राज्याचे ध्वजारोहण
गडचिरोली : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी गडचिरोली येथे विदर्भवाद्यांकडून स्वतंत्र विदर्भ राज्याचे ध्वजारोहण महाराष्ट्रदिनी केले जाणार आहे. त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्रात विदर्भावर सातत्याने होणाऱ्या अन्यायाविरोधात काळीफित लावून राज्य शासनाचा निषेध केला जाणार आहे.
गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात सकाळी ९.३० वाजता स्वतंत्र विदर्भ राज्याचे ध्वजारोहण व काळीफित लावून राज्य शासनाचा निषेध केला जाणार आहे. या कार्यक्रमाला विदर्भवाद्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विदर्भवादी संघटनांचे पदाधिकारी, अरूण मुनघाटे, सुरेश पोरेड्डीवार, रमेश भुरसे, विजय कोतपल्लीवार, अॅड. संजय ठाकरे, रोहिदास राऊत, प्रतिभा चौधरी, रमेश उप्पलवार, नामदेव गडपल्लीवार, अमिता लोणारकर, गोवर्धन चव्हाण, दत्तात्रय बर्लावार, पांडुरंग घोटेकर, चंद्रशेखर जक्कनवार, शालीक नाकाडे, दादाजी चापले, चंद्रशेखर भडांगे, एजाज शेख, समय्या पसुला, रमेश बारसागडे, प्रभाकर गव्हारे, सुधाकर नाईक, जगदीश म्हस्के, शरद ब्राह्मणवाडे, भास्कर कोठारे, प्रभाकर वासेकर, खुशाल वाघरे, डॉ. देवेंद्र मुनघाटे, विवेक चटगुलवार, पांडुरंग भांडेकर, गोविंदराव बानबले, दादाजी चुधरी, सिद्धार्थ नंदेश्वर, सुरेश मांडवगडे, जनार्धन साखरे, नामदेव खोब्रागडे, श्याम वाढई यांनी केले आहे.