शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

फुलेंच्या विचारांनीच समाजाची प्रगती

By admin | Updated: January 12, 2016 01:20 IST

माळी समाजात अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरा वाढत आहेत. अंधश्रद्धेत समाज आकंठ बुडत असल्याचे घटनांवरून दृष्टीस पडते.

शिवणी येथे माळी समाज प्रबोधन मेळावा : ४० उपवर-वधूंनी दिला परिचय; मान्यवरांचा सूरंंगडचिरोली : माळी समाजात अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरा वाढत आहेत. अंधश्रद्धेत समाज आकंठ बुडत असल्याचे घटनांवरून दृष्टीस पडते. माळी समाजाला अंधश्रद्धेपासून परावृत्त करण्यासाठी महात्मा फुले यांच्या विचारसरणीची गरज आहे. महात्मा फुले यांच्या विचारांनीच माळी समाजाची प्रगती शक्य आहे, असा सूर मान्यवरांनी काढला. शिवणी येथे माळी समाज प्रबोधन मेळावा व उपवर- वधू परिचय मेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्त्या चंद्रकला महाडोळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पुरूषोत्तम निकोडे होते. प्रमुख अतिथी म्हणून दिलीप कोटरंगे, अखिल भारतीय माळी महासंघाचे उपाध्यक्ष राजेंद्र महाडोळे हजर होते. मंचावर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. पी. लांबे, गुणाबाई गुरनुले, नानाजी वाढई, प्रा. मोहुर्ले, अहेरीच्या पं. स. सदस्य सरिता वाडगुरे, इंदिरा मोहुर्ले, माया मोहुर्ले, भैयाजी वाढई, अ‍ॅड. भोजराज वसाके, प्रा. राम गुरनुले, वासुदेव मोहुर्ले उपस्थित होते. मेळाव्यात एकूण ४० उपवर- वधूंनी परिचय दिला. स्त्रियांनी मुलांवर योग्य संस्कार करून वाईट चालिरीतींपासून मुलांना दूर ठेवावे, शक्यतो मेळाव्यांमध्ये मुलामुलींचे लग्न करून पैसा व वेळेची बचत करावी, असे आवाहन चंद्रकला महाडोळे यांनी केले. विज्ञानाची कास धरल्याशिवाय माळी समाजाची प्रगती अशक्य आहे, असे प्रतिपादन पुरूषोत्तम निकोडे यांनी मेळाव्यात केले. ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेची आवश्यकता का आहे? याबाबत सविस्तर मार्गदर्शन करीत ओबीसी संघटनांनी पुकारलेल्या कोणत्याही उपक्रमात माळी समाजाने सहभागी व्हावे, असे आवाहन दिलीप कोटरंगे यांनी समाज बांधवाना यावेळी केले. माळी समाजातील सर्व पोटजातींनी एकत्र येऊन समाज एकसंघ करावा, तसेच समाजाने शिक्षणाची कास धरावी, असे आवाहन राजेंद्र महाडोळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजसंघटनेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत लेनगुरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अशोक मांदाळे, संजय लेनगुरे तर आभार रमेश जेंगठे यांनी मानले. यशस्वीतेसाठी घनश्याम गुरनुले, दत्तू चौधरी, योगेश सोनुले, नीलकंठ निकुरे, हरिदास कोटरंगे, लक्ष्मण मोहुर्ले, शंकर चौधरी, शंकर गुरनुले, रेवतीनाथ कावळे, नरेंद्र निकोडे, देवराव मोहुर्ले, पुरण पेटकुले, देवेंद्र लोनबले, अरूण चौधरी, रमेश मोहुर्ले, युवराज मांदाळे, वसंत गावतुरे, भाष्कर जेंगठे, नामदेव गुरनुले, दीपक गावतुरे, संतोष चौधरी यांनी सहकार्य केले. मेळाव्यानंतर रात्री ‘ज्योती सावित्रींची’ कार्यक्रम धानोरा येथील पथकाने सादर केला. मेळाव्यात गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो माळी समाजबांधव उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)