विद्यार्थ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:27 AM2019-08-10T00:27:19+5:302019-08-10T00:27:47+5:30

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था गडचिरोली अंतर्गतच्या जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागाच्या वतीने जिल्हा परिषद हायस्कूल गडचिरोली येथील दहावी, अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन करण्यात आले.

Professional guidance to students | विद्यार्थ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन

विद्यार्थ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन

Next
ठळक मुद्देडीआयईसीपीडीचा उपक्रम : जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था गडचिरोली अंतर्गतच्या जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागाच्या वतीने जिल्हा परिषद हायस्कूल गडचिरोली येथील दहावी, अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी डीआयईसीपीडीचे प्राचार्य शरदचंद्र पाटील, अधीव्याख्याता तथा जिल्हा समन्वयक पुनित मातकर, मिलींद अघोर, वैशाली एगलोपवार, विषय समन्वयक सुचरिता काळे, संजय बिडवाईकर, तपन सरकार, कुणाल कोवे, संजय नांदेकर, गुलराज मेंढे, किरण काळबांधे, विठ्ठल होंडे, नीलकंठ शिंदे आदी उपस्थित होते.
दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक क्षेत्र उपलब्ध आहेत. आपल्याला ज्या क्षेत्रात काम करण्याची आवड आहे, त्या क्षेत्राची निवड करून त्या क्षेत्रातील शिक्षण व प्रशिक्षण घेतल्यास करिअर करताना अडचणी जात नाही. जगात अनेक क्षेत्र आहेत. प्रत्येक क्षेत्रात करिअर करण्याची संधी आहे. त्यामुळे स्वत:च्या आवडीनुसार क्षेत्राची निवड करणे आवश्यक आहे. जे क्षेत्र निवडाल, त्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी पोहोचण्याची जिद्द ठेवली पाहिजे, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन प्राचार्य शरदचंद्र पाटील यांच्यासह इतरांनी केले.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले. विविध उदाहरणांच्या माध्यमातून उपस्थित मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. सुमारे तीन तास चाललेल्या या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान होण्यास मदत झाली. कार्यशाळेचे संचालन समुपदेशक प्रभाकर साखरे तर आभार समुपदेशक सुनील उंदीरवाडे यांनी मानले. कार्यशाळेला जिल्हा परिषद हायस्कूलचे शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Professional guidance to students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.