आरमोरी व वैरागड येथे निघाली मिरवणूक
By Admin | Updated: October 9, 2014 23:02 IST2014-10-09T23:02:27+5:302014-10-09T23:02:27+5:30
भोई, ढिवर व काहार समाजाच्यावतीने महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त ७ आॅक्टोबर रोजी आरमोरी व वैरागड येथे मिरवणूक काढण्यात आली.

आरमोरी व वैरागड येथे निघाली मिरवणूक
आरमोरी/ वैरागड : भोई, ढिवर व काहार समाजाच्यावतीने महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त ७ आॅक्टोबर रोजी आरमोरी व वैरागड येथे मिरवणूक काढण्यात आली.
आरमोरी - येथील ढिवर व भोई समाजातर्फे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त सायंकाळी ७ वाजता घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर रात्री भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी ८ तारखेला महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेची शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. ही रॅली दुर्गा मंदिर-राम मंदिर- पटेल चौक, आझाद चौक- पंचायत समितीचा मुख्य मार्ग - गुजरी ते वाल्मिकी मंदिरापर्यंत नेण्यात आली. या रॅलीमध्ये भजन व वाल्मिकीचे देखावे दाखविण्यात आले. सदर रॅली यशस्वीतेसाठी देवा दुमाने, मनोहर खेळेकर, मीनाक्षी गेडाम, महादेव दुमाने, लहू दुमाने, विठ्ठल दुमाने, राजू दुमाने, सीताराम गेडाम, शरद मेश्राम, मंगेश दिघोरे, बाळू खेडकर, मंगेश खेडकर, संदीप दुमाने, भाऊराव मारबते, गोविंद मानकर, सारिका मारबते, कविता कांबळे, सायत्रा मेश्राम, नलू शेंडे, सुनीता दुमाने व भोई, ढिवर समाजातील बहुसंख्य नागरिकांनी सहकार्य केले.
वैरागड- येथे ढिवर-काहार समाजाच्यावतीने महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली. महर्षी वाल्मिकीच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार , माजी जि. प. सदस्य केशव गेडाम, मनोहर खेडेकर, आरमोरीचे उपसरपंच निंबेकार, भास्कर बोडणे, महादेव दुमाने, डोनूजी कांबडे, लाडे, दामोधर मेश्राम, डी. ए. हुमने, विश्वनाथ ढेंगरे, चुडाराम भानारकर, प्रा. प्रदीप बोडणे, रामदास डोंगरवार, मुरारी दुमाने आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन सावजी धनकर यांनी केले. यादरम्यान गावाच्या मुख्य रस्त्याने महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यशस्वीतेसाठी नकटू दुमाने, ऋषी कांबळे, रघुनाथ मानकर, रेखा मानकर, लता धनकर, ईश्वर दुमाने, महादेव मेश्राम, शंकर सोनबावणे यांच्यासह ढिवर-काहार समाजातील नागरिकांनी सहकार्य केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)