पाेलीस महासंचालकांनी जाणल्या जवानांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:51 IST2021-02-05T08:51:25+5:302021-02-05T08:51:25+5:30

गडचिराेली : राज्याचे नवनियुक्त पाेलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी २५ जानेवारी राेजी गडचिराेली पाेलीस दलास भेट दिली. यावेळी त्यांनी ...

The problems of the soldiers known to the Director General of Police | पाेलीस महासंचालकांनी जाणल्या जवानांच्या समस्या

पाेलीस महासंचालकांनी जाणल्या जवानांच्या समस्या

गडचिराेली : राज्याचे नवनियुक्त पाेलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी २५ जानेवारी राेजी गडचिराेली पाेलीस दलास भेट दिली. यावेळी त्यांनी जवानांसाेबत चर्चा करून नक्षल अभियान राबविताना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. नक्षलवाद्यांशी लढताना ज्या पाेलीस जवानांनी प्राणाची आहुती दिली त्या वीर शहीद जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेल्या शाैर्य स्थळाला महासंचालकांनी भेट दिली. शहिदांच्या कुटुंबीयांच्या अडचणी जाणून घेतल्या. विशेष अभियान पथकासाठी उभारण्यात आलेल्या नवीन वास्तुचे उद्घाटन केले. आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना धनादेश व जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच पाेलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पाेलीस उपनिरीक्षक संदीप पाटील पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल, अपर पाेलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पाेलीस अधीक्षक समीर शेख, साैमय मुंडे हजर हाेते.

बाॅक्स ...

जुन्या आठवणींना उजाळा

पाेलीस महासंचालक हेमंत नगराळे हे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील सहायक पाेलीस आयुक्तपदी कार्यरत हाेते. त्या ठिकाणीची सेवा अविस्मरणीय असल्याचे सांगितले. गडचिराेली पाेलीस दलाच्या पाठीशी शासन उभे आहे. पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या साेडविल्या जातील. नक्षल चळवळ माेडून काढण्यासाठी पाेलीस दलातील कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक शस्त्र, साहित्य, प्रशिक्षण दिले जाईल. तसेच सर्व साेयी-सुविधासुद्धा पुरविल्या जातील, असे मार्गदर्शन केले.

Web Title: The problems of the soldiers known to the Director General of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.