अप्पर पोलीस अधीक्षकांंनी जाणल्या नक्षल कुटुंबाच्या समस्या

By Admin | Updated: November 29, 2015 02:21 IST2015-11-29T02:21:14+5:302015-11-29T02:21:14+5:30

गडचिरोली पोलीस विभागाच्या वतीने १९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर यादरम्यान आत्मसमर्पण पंधरवडा साजरा करण्याचे ठरविले आहे.

Problems with the Naxal family aware of the Additional Superintendent of Police | अप्पर पोलीस अधीक्षकांंनी जाणल्या नक्षल कुटुंबाच्या समस्या

अप्पर पोलीस अधीक्षकांंनी जाणल्या नक्षल कुटुंबाच्या समस्या

चिचोड गावाला दिली भेट : भेट वस्तू देऊन केले स्वागत
गडचिरोली : गडचिरोली पोलीस विभागाच्या वतीने १९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर यादरम्यान आत्मसमर्पण पंधरवडा साजरा करण्याचे ठरविले आहे. या अंतर्गत पोलीस प्रशासनातील पोलीस अधिकारी नक्षलवाद्यांच्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.
गडचिरोली पोलीस दलाने नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणासाठी नवजीवन योजना राबवून नक्षल्यांना आत्मसमर्पण करवून घेतले. याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. मागील काही महिन्यांत गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या तसेच लगतच्या छत्तीसगड व तेलंगना राज्यातील अनेक नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. काही नक्षल्यांना अटकही करण्यात आली. अटक व आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये प्लाटून कमांडर, दलम कमांडर, उपकमांडर व दलम सदस्य यांचा समावेश आहे. नक्षल सदस्यांना आत्मसमर्पण करून त्यांना एक आदर्श नागरिक तयार करण्यासाठी आत्मसमर्पण योजना सूरू केली आहे. या योजनेची जनजागृती करण्याच्या उद्देशाने आत्मसमर्पन पंधरवडा राबविण्यात येत आहे. या अभीयानादरम्यान गडचिरोली जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधिक्षक (अभीयान) एम. राजकुमार व सी-६० चे पोलीस अधिकारी यांनी नक्षलावाद्यांच्या गावी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. नक्षलवाद्यांचे काम करत असलेल्या चिचोड गावातील चातगाव एलओएस सदस्य शिवाजी उर्फ निलेश मडावी याच्या कुटुुंबियांची भेट घेतली. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी कुटुुंबाची परिस्थिती जाणून घेतली. मडावी कुटुंबाला साडी-चोळी, शर्ट-पँट कापड व भेटवस्तू दिली. यावेळी शिवाजीची आई, काका, चुलतभाऊ, गावचे सरपंच, गाव पाटील तसेच गावातील इतर नागरिक उपस्थित होते. यावेळी एम. राजकुमार यांनी सामान्य नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस काम करीत आहेत. शासनाच्या अनेक योजना गरीब नागरिकांसाठी राबविल्या जात आहेत. त्यांचा लाभ घेवून आपला विकास साधावा असे मार्गदर्शन केले.(नगर प्रतिनिधी)

Web Title: Problems with the Naxal family aware of the Additional Superintendent of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.