नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवा
By Admin | Updated: October 6, 2015 02:03 IST2015-10-06T02:03:38+5:302015-10-06T02:03:38+5:30
कास्ट्राईब नगर परिषद कर्मचारी संघटना गडचिरोलीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना शनिवारी निवेदन देऊन नगर

नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवा
गडचिरोली : कास्ट्राईब नगर परिषद कर्मचारी संघटना गडचिरोलीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना शनिवारी निवेदन देऊन नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी केली आहे.
नगर परिषद कर्मचारी व शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेस द्यावे, १२ वर्ष झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करावी, कर्मचारी व शिक्षकांच्या सेवा पुस्तिकेत वाढीव अर्हतेची नोंद करावी, बिंदू नामावली अद्यावत करावी, आरटीईनुसार जागा तत्काळ भराव्या, बीएलओ म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकांना १५ टक्के प्रोत्साहन भत्ता द्यावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. निवेदन देतेवेळी जिल्हा महासंघाचे अध्यक्ष राजकुमार घोडेस्वार, प्रभाकर साखरे, कास्ट्राईब महासंघाचे सरचिटणीस गंगाधर मडावी, रवींद्र उईके, रवींद्र पटले, उपाध्यक्ष प्रमोद भानारकर, विरेंद्र सोनवाने, राजेंद्र पेंदाम, कांतीलाल, प्रशांत आकनुरवार आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)