आमदारांनी जाणल्या रोजगारसेवकांच्या समस्या
By Admin | Updated: February 28, 2017 00:50 IST2017-02-28T00:50:12+5:302017-02-28T00:50:12+5:30
विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी १५ फेब्रुवारीपासून ग्रामरोजगार सेवकांच्या वतीने राज्यव्यापी बेमुदत आंदोलन केले जात आहे.

आमदारांनी जाणल्या रोजगारसेवकांच्या समस्या
आंदोलनस्थळी भेट : विविध मागण्या
आरमोरी : विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी १५ फेब्रुवारीपासून ग्रामरोजगार सेवकांच्या वतीने राज्यव्यापी बेमुदत आंदोलन केले जात आहे. आरमोरीतही ग्रामरोजगार सेवक आंदोलन करीत आहेत. या आंदोलनस्थळी आ. क्रिष्णा गजबे यांनी सोमवारी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
ग्रामरोजगार सेवकांना रोजगार हमीची विविध कामे करावी लागतात. परंतु कामाचा अत्यल्प मोबदला दिला जातो. शासन निर्णयानुसार २.२५ टक्के मानधन दिले जात आहे. शासन निर्णयानुसार रोजगार सेवकांचे मानधन अर्धवट स्वरूपाचे आहे. त्यामुळे इतर राज्याप्रमाणे, ग्रामरोजगार सेवकांना वेतन द्यावे, रोजगारसेवकांचे गावापासून पाच किमीच्या आत स्थानांतर करावे, स्वतंत्र खात्यात वेतन जमा करावे, अशी मागणी ग्रामरोजगार सेवकांची आहे. यावेळी पं. स. सभापती सविता भोयर, नंदू पेटेवार, पंकज खरवडे, नंदू नाकतोडे, संवर्ग विकास अधिकारी सजनवार उपस्थित होते. (वार्ताहर)