शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी जाणल्या देसाईगंजच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 05:00 IST

समस्या आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांसमाेर मांडली असता धान खरेदीची मर्यादा वाढविण्याचे आश्वासन दिले. वनहक्क पट्टेधारकांची ऑनलाईन नाेंदणी होत नसल्याने त्यांनाही धान विक्रीसाठी अडचणी येत आहेत. काेरची, कुरखेडा व धानाेरा तालुक्यातील काही जुने केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे केंद्र पुन्हा सुरू करावे. परतीच्या पावसाने पीक भिजलेल्या शेतकऱ्यांचेही धान खरेदी करावे, अशी मागणी आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

ठळक मुद्देतहसील कार्यालयात बैठक : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा

  लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी गुरूवारी देसाईगंजला भेट देऊन तहसील कार्यालयात आढावा घेतला. दरम्यान त्यांनी तालुक्यातील विविध समस्या उपस्थितांकडून जाणून घेत शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा केली. याप्रसंगी आ. कृष्णा गजबे, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम तसेच तहसीलदार उपस्थित हाेते. बैठकीत आ. गजबे यांनी विविध समस्या मांडल्या. यामध्ये कोरोनाकाळात शेतमालाला याेग्य भाव नाही. उशिरा पाऊस, महापुराने झालेले नुकसान आदींचा समावेश हाेता. प्रशासनाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे झाले असले तरी अघापही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. तसेच आदिवासी विकास  महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनच्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना धान्य विक्रीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वनहक्कधारक शेतकऱ्यांसमाेर धानविक्रीची समस्या निर्माण झाली आहे. काही शेतकरी खासगी व्यापाऱ्यांनाही धानाची विक्री करीत आहेत.  त्यामुळे ही समस्या साेडवावी, अशी मागणी आ. कृष्णा गजबे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चर्चेदरम्यान केली.

धान खरेदीची मर्यादा वाढविण्याचे आश्वासनमागील वर्षी आधारभूत खरेदी याेजनेंतर्गत प्रती एकरी १२ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. परंतु यावर्षी प्रती एकरी ९.६० क्विंटल धानाची खरेदी करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना धान विक्रीस अडचणी येत आहेत. ही समस्या आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांसमाेर मांडली असता धान खरेदीची मर्यादा वाढविण्याचे आश्वासन दिले. वनहक्क पट्टेधारकांची ऑनलाईन नाेंदणी होत नसल्याने त्यांनाही धान विक्रीसाठी अडचणी येत आहेत. काेरची, कुरखेडा व धानाेरा तालुक्यातील काही जुने केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे केंद्र पुन्हा सुरू करावे. परतीच्या पावसाने पीक भिजलेल्या शेतकऱ्यांचेही धान खरेदी करावे, अशी मागणी आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी