आदिवासी सेवकांच्या समस्या मार्गी लावा

By Admin | Updated: December 22, 2016 02:24 IST2016-12-22T02:24:26+5:302016-12-22T02:24:26+5:30

आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या महाराष्ट्र शासन पुरस्कृत आदिवासी सेवकांच्या विविध प्रलंबित मागण्या निकाली काढाव्यात,

Problems of Adivasi Sevaks | आदिवासी सेवकांच्या समस्या मार्गी लावा

आदिवासी सेवकांच्या समस्या मार्गी लावा

मुख्यमंत्र्यांकडे मागणी : शिष्टमंडळ भेटले
गडचिरोली : आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या महाराष्ट्र शासन पुरस्कृत आदिवासी सेवकांच्या विविध प्रलंबित मागण्या निकाली काढाव्यात, अशी मागणी आ. वैभव मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विकास परिषदेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात आ. नरहरी शिरवाळ, आ. पांडुरंग वरोरा, आ. निर्मला गावीत, आ. काशिराम पावरा, आ. संतोष टारपे, आ. दीपिका चव्हाण, परिषदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष घनश्याम मडावी, विदर्भ संपर्कप्रमुख आर. यू. केराम, केशव तिराणिक, नारायण मडावी, सूर्यकांत उईके, दिनेश केराम यांचा समावेश होता.
आदिवासी सेवकांना दरमहा दहा हजार रुपये मानधन देण्यात यावे, निमआराम, आंतरराज्य, वातानुकुलीत बसमधूनही मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करावी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत संनियंत्रण समितीमध्ये प्रतिनिधीत्व द्यावे, आदिवासी सेवकांना मोफत रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Problems of Adivasi Sevaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.