सर्वेक्षणातून जाणल्या कासवीच्या समस्या
By Admin | Updated: December 23, 2015 02:00 IST2015-12-23T02:00:37+5:302015-12-23T02:00:37+5:30
स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयाच्या रासेयो विभागाच्या वतीने १९ व २० डिसेंबर रोजी विद्यार्थी व प्राध्यापकांनी ...

सर्वेक्षणातून जाणल्या कासवीच्या समस्या
प्रत्येक कुटुंबाला भेट : महात्मा गांधी महाविद्यालयाच्या रासेयो विभागाचा उपक्रम
आरमोरी : स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयाच्या रासेयो विभागाच्या वतीने १९ व २० डिसेंबर रोजी विद्यार्थी व प्राध्यापकांनी सर्वेक्षण करून कासवी गावातील कुटुंबाच्या समस्या जाणून घेतल्या.
ग्राम सर्वेक्षणांतर्गत १८० कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात कुटुंबाची वैयक्तिक माहिती आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य, धार्मिक, सामाजिक, सहकार, राजकारण व स्थलांतर विषयक माहिती गोळा करण्यात आली. या सर्वेक्षणात रासेयोच्या ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन कुटुंब प्रमुखांकडून माहिती भरून घेतली. सर्वेक्षणादरम्यान प्रत्येक कुटुंबाने रासेयो विद्यार्थ्याना सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. ग्राम सर्वेक्षणाच्या माध्यमातून सदर गावाचा आर्थिक स्तर जेमतेम असल्याचे दिसून आले. गावात आरोग्याच्या सोयी अल्प आहेत. गावातील धार्मिक वातावरण सलोख्याचे असल्याचेही नि:ष्पन्न झाले. सदर सर्वेक्षण प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यासाठी रासेयो प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर ठाकरे, डॉ. अमिता बन्नोरे, डॉ. विजय गोरडे, प्रा. गंगाधर जुआरे, प्रा. शशिकांत गेडाम, प्रा. मोहनलाल रामटेके, प्रा. डॉ. राजेंद्र घोनमोडे, प्रा. नोमेश मेश्राम, प्रा. मनोज ठवरे, प्रा. प्रमोद रामटेके, प्रा. कविता खोब्रागडे, प्रा. सुनंदा मडावी, विवेकानंद भाजीपाले, युगेश्वरी भोयर, याशिका चहांदे, मधुकर चापले, युक्ती जुआरे, आशन्ना कुरेशी यांनी सहकार्य केले. कासवीचे उपसरपंच प्रवीण रहाटे, ग्रामसेवक बी. टी. जौंजालकर, कृषीमित्र दीपक दुपारे, अजय गुरनुले, चंद्रकांत दोनाडकर, गुलाब भोयर, विश्वास कांदोर यांनीही सहकार्य केले. संस्थाध्यक्ष किशोर वनमाळी, कार्याध्यक्ष अब्दुलभाई पंजवानी यांनी या कार्याचे कौतुक केले. (वार्ताहर)