शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

विद्यार्थ्यांना सांडपाण्याचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 5:00 AM

तालुक्यातील नगरम जि.प.उच्च प्राथमिक शाळेच्या समोर सांडपाणी जमा होते. त्यामुळे येथून आवागमन करणाऱ्या तसेच खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना दुर्गंधीमुळे आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सांडपाण्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

ठळक मुद्देनगरम जि.प.शाळेसमोरील स्थिती : आरोग्याची समस्या उद्भवण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यातील नगरम जि.प.उच्च प्राथमिक शाळेच्या समोर सांडपाणी जमा होते. त्यामुळे येथून आवागमन करणाऱ्या तसेच खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना दुर्गंधीमुळे आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सांडपाण्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.रस्त्याने आवागमन करणाऱ्या वाहनांमुळे परिसरात खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. या खड्ड्यांमध्ये परिसरातील सांडपाणी जमा होऊन राहते. अनेक विद्यार्थी या खड्ड्यांमध्ये पळून जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सदर परिसर सोयीचा आहे. परंतु याच ठिकाणी सांडपाणी साचून राहत असल्याने विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी ग्रामसभेत तसेच तोंडी सांगून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु याकडे दुर्लक्ष झाले.सांडपाण्यामुळे विद्यार्थ्यांना विविध रोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सांडपाण्याच्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर डासांची पैदास होत आहे. याचा त्रास दिवसा विद्यार्थी व शिक्षक तसेच परिसरातील नागरिकांनाही होत आहे. त्यामुळे खड्डे बुजवून सांडपाण्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी मुख्याध्यापक आर.एम.रच्चावार, सत्यनारायण कोत्तावडला, कंबगौणी सदाशिव, श्रीधर कंबगौणी, सत्यनारायण आईला, राजाराम अरिगेला, समय्या कोडूरी, रवींद्र येरगंधया, किरण गुंडा, रवींद्र गुंडा, प्रिसेलम कोडी, रवीनेना ओल्लाला, नागेश गंटा, राणू कडार्ला, जंपय्या बद्दी, बापू गुट्टू, रमेश तोटा, सल्ला मलय्या, सुरेश कंबगौणी, सदानंदम पेदीट्टी, व्यंकटेशराव कंबगौणी, भिमन्ना कंबगौणी यांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.यासंदर्भात संवर्ग विकास अधिकारी व ग्रामसचिवांनाही निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Socialसामाजिक