१२० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
By Admin | Updated: November 10, 2015 02:11 IST2015-11-10T02:11:05+5:302015-11-10T02:11:05+5:30
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त संकल्प बहुउद्देशीय संस्था चुरचुरा द्वारा संचालित चाणक्य अभ्यासिका गडचिरोलीच्या वतीने प्राथमिक व माध्यमिक ....

१२० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
गडचिरोली : महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त संकल्प बहुउद्देशीय संस्था चुरचुरा द्वारा संचालित चाणक्य अभ्यासिका गडचिरोलीच्या वतीने प्राथमिक व माध्यमिक अशा दोन स्तरावर गडचिरोलीत घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या तसेच प्रोत्साहन बक्षीस पटकाविणाऱ्या १२० विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव रविवारी करण्यात आला.
बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक, न. प. उपाध्यक्ष प्रा. रमेश चौधरी, अरूण मुनघाटे, पंकज गुड्डेवार, गोपीदास गेडेकर, महेंद्र ब्राम्हणवाडे, सतीश विधाते, संस्थेचे अध्यक्ष प्रा. पंकज नरूले, कृष्णा रेड्डी उपस्थित होते.
मनाची एकाग्रता साधून ईच्छाशक्तीच्या बळावर यश संपादन करणे शक्य आहे, असे प्रतिपादन डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले. विद्यार्थ्यांनी सुरक्षितता, ईच्छाशक्ती, एकाग्रता आदी तीन मूल्यांवर लक्ष केंद्रीत करून यश संपादन करावे, असे आवाहन डॉ. सागर कवळे यांनी केले. संचालन गीता भरडकर, नीकिता पारपेल्लीवार तर आभार प्राची तोडेवार हिने मानले. शीतल गेडाम, अमित तलांडे, मनीष फुलसंगे, योगेश कुळमेथे, सुमित कुळमेथे, किशोर वैरागडे, कुळमेथे, राऊत, पेंदाम यांनी सहकार्य केले.