शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिकांकडून पॉलिथिन जप्तीच्या मोहिमेवर नगराध्यक्ष

By admin | Updated: December 24, 2015 01:55 IST

प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणाला तसेच जनावरांना हानी पोहोचते. त्यामुळे प्लास्टिकचा वापर थांबविण्यात यावा, यासाठी पालिका प्रशासनाने अनेकदा प्रयत्न केले.

शेकडो क्विंटल पॉलिथिन जप्त : गोंडवाना सैनिकी विद्यालयाचा पुढाकारगडचिरोली : प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणाला तसेच जनावरांना हानी पोहोचते. त्यामुळे प्लास्टिकचा वापर थांबविण्यात यावा, यासाठी पालिका प्रशासनाने अनेकदा प्रयत्न केले. परंतु त्याला यश आले नाही. अखेरीस बुधवारी गडचिरोलीच्या नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक-यादव यांनी गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या पुढाकाराने मोहीम राबवून विद्यार्थ्यांनी व्यापाऱ्यांकडून शेकडो क्विंटल पॉलिथिन बॅग जप्त केल्या.गोंडवाना सैनिकी विद्यालय मागील वर्षीपासून पॉलिथिन बंदीसाठी पुढाकार घेऊन आहे. यापूर्वीही या शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनेकदा व्यापाऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करून पॉलिथिन वापर बंद करा, असे सांगितले होते. गेल्या महिन्यात गडचिरोली नगर पालिकेने चार ते पाच दिवस शहरात ध्वनीक्षेपक लावून व्यापाऱ्यांना पॉलिथिनचा वापर थांबवा, अशी विनंती केली होती. १ जानेवारी २०१५ पासून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या, खर्रा पन्न्या आदी वापरावर बंदी घातली असताना याचा काहीही परिणाम दिसून येत नव्हता. पालिका प्रशासनाने ५०० रूपये दंड करण्यात येईल, असेही सूचविले होते. परंतु त्यानंतरही वापर थांबला नाही. अखेरीस गोंडवाना सैनिकी विद्यालय, मराठी विज्ञान परिषद गडचिरोली व नगर पालिका गडचिरोली यांनी संयुक्त मोहीम राबवून बुधवारी धडक कारवाई केली.यावेळी नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक-यादव, गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य संजय भांडारकर, नगर पालिकेचे स्वच्छता विभागाचे प्रमुख संतोषवार व सैनिकी शाळेचे शिक्षक उपस्थित होते. पटेल सायकल स्टोअर्स ते आठवडी बाजार या मार्गावरील सर्व व्यावसायिक प्रतिष्ठानातून पन्न्या व प्लास्टिक जप्त करून नेण्यात आले व या सर्वांना प्लास्टिक बंदीबाबत सूचना पत्रही वितरित करण्यात आले. दुकानांवर या संदर्भात स्टिकर्स सुद्धा चिपकविण्यात आले. (शहर प्रतिनिधी)