प्रात्यक्षिकांचा अहवाल सादर
By Admin | Updated: February 19, 2017 01:17 IST2017-02-19T01:17:45+5:302017-02-19T01:17:45+5:30
कृषी विज्ञान केंद्र सोनापूर-गडचिरोली येथे शुक्रवारी शास्त्रीय सल्लागार समितीची ९ वी सभा पार पडली.

प्रात्यक्षिकांचा अहवाल सादर
संचालकांच्या सूचना : कृषी विज्ञान केंद्रात शास्त्रीय सल्लागार समितीची सभा
गडचिरोली : कृषी विज्ञान केंद्र सोनापूर-गडचिरोली येथे शुक्रवारी शास्त्रीय सल्लागार समितीची ९ वी सभा पार पडली. या सभेत विविध प्रात्यक्षिकांचा अहवाल सादर करण्यात आला. दरम्यान विविध बाबींवर चर्चाही करण्यात आली.
रब्बी २०१६-१७ या हंगामातील ९ व्या सभेचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. पी. जी. इंगोले यांच्या हस्ते झाले. यावेळी हैदराबाद येथील कृषी तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे डॉ. चारी अप्पाजी, सिंदेवाही येथील सहयोगी संशोधन संचालक डॉ. पी. व्ही. शेंडे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. बी. अमरशेट्टीवार, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, कृषी विकास अधिकारी सूर्यवंशी, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जे. तांबे उपस्थित होते. शास्त्रीय सल्लागार समितीच्या सभेत २०१६-१७ चा प्रगती अहवाल, प्रथमरेषीय प्रात्यक्षिकांचा अहवाल, अनुनियोजित चाचणी अहवाल तसेच बीजोत्पादन कार्यक्रम अहवाल, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जे. तांबे यांनी सादर केला. डॉ. चारी अप्पाजी व डॉ. पी. जे. इंगोले, डॉ. पी. व्ही. शेंडे यांनी कृषी विज्ञान केंद्रातील प्रक्षेत्रास भेट देऊन सध्या प्रात्यक्षिक स्वरूपात लागवड केलेल्या रब्बी पिकाची पाहणी केली व मार्गदर्शक सूचनाही केल्या. दरम्यान डॉ. इंगोले यांनी कृषी विज्ञान केंद्रातील विषयविशेषज्ज्ञांशी अनेक बाबींवर चर्चा केली.
कार्यक्रमाचे संचालन विषयविशेषज्ज्ञ (गृहविज्ञान) डॉ. योगीता सानप तर आभार विषयविशेषज्ज्ञ (उद्यानविद्या) अनिल तारू यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विषयविशेषज्ज्ञ (पशु व दुग्धशास्त्र) डॉ. विक्रम कदम, विषयविशेषज्ज्ञ (पीक संरक्षण) पुष्पक बोथीकर, विषयविशेषज्ज्ञ (कृषी अभियांत्रिकी) ज्ञानेश्वर ताथोड, प्रक्षेत्र व्यवस्थापक सुनीता थोटे, लघु लेखिका ज्योती परसुटकर, गजेंद्र मानकर, हितेंद्र राठोड, नेशन टेकाम, प्रमोद भांडेकर, प्रवीण नामूर्ते, जितेंद्र कस्तुरे, बाबुराव भोयर यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)